मतदारसंघ फेररचनेसाठी केंद्र सरकारची तयारी जोरात, पण बहुमताचं गणित कसं जुळणार? ७ खासदार पडतायत कमी

NDA's Numbers Game : मतदारसंघ फेररचना विधेयक याआधीही लोकसभेत मांडण्यात आलं होतं. १७ एप्रिल २०२६ रोजी मांडलेलं हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नव्हतं. आताही दोन तृतियांश बहुमत जुळवण्याचं आव्हान सरकारसमोर आहे.
NDA's Numbers Game

NDA's Numbers Game

Esakal

Updated on: 

केंद्र सरकार ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाच्या माध्यमातून लोकसभेतील जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत मिळवावं लागणार आहे. लोकसभेत NDA ची संख्या वाढली असली तरी आवश्यक मतांची जुळवाजुळव अजून बाकी आहे.

Loading content, please wait...