PM Narendra Modi : आचारसंहितेच्या पूर्वी पंतप्रधानांचं देशवासियांना खुलं पत्र; लोकांकडून मागवल्या सूचना

PM Modi Latest News : निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. 'मेरे प्रिय परिवारजन' असं म्हणत मोदींनी पत्रामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मतं मागवली आहेत.
narendra modi
narendra modiesakal

PM Modi Latest News : निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. 'मेरे प्रिय परिवारजन' असं म्हणत मोदींनी पत्रामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मतं मागवली आहेत.

पत्रामध्ये मोदी म्हणतात, माझ्या आणि तुमच्या नात्याला एक दशक पूर्ण झालं आहे. तुमचं सहकार्य आम्हाला कायम मिळणार, असा मला विश्वास आहे. राष्ट्र निर्माणासाठी आम्ही सातत्याने कष्ट घेत आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे.

narendra modi
LIC Salary Hike: निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना सरकारची भेट; किती वाढला पगार?

मोदी पत्रामध्ये लिहितात, देशातल्या १४० कोटी कुटुंबियांचा विश्वास, समर्थन यामुळे निर्माण झालेलं नातं विशेष आहे. या नात्याला शब्दामध्ये व्यक्त करणं अवघड आहे. देशातील कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणं, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. शेतकरी, गरीब, युवक आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आमच्या सरकारने इमानदारीने काम केलं आहे. त्याचे परिणाम आज देशाला दिसून येत आहेत.

त्यांनी पत्रामध्ये जीएसटी, कलम ३७०, तीन तलाख, महिलांसाठीचं नारी शक्ती वंदन विधेयक याविषयी माहिती दिली. याशिवाय आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी लोकांकडून समर्थन आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

narendra modi
Satara Loksabha : साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट? रामराजेंच्या उमेदवारीच्या चर्चेने खळबळ, 'ती' पोस्ट व्हायरल

भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंगण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारचा विकासाचा अजेंडा आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचा दावा हा भाजपचा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरुनच पंतप्रधानांनी थेट लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

पंतप्रधानांनी पत्रामध्ये शेवटी म्हटलंय की, लोकशाहीचं सौंदर्य हे लोकसहभागात आहे. देशहितासाठी मोठे निर्णय घेणं, मोठ्या योजना बनवणं आणि त्या लागू करणं लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मला तुमच्या सहकार्याची आणि सूचनांची नितांत गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमची साथ मला मिळणारच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com