Lok Sabha Election : ज्योतिष्याच्या सांगण्यावर ठरला होता अमेठीचा उमेदवार; इंदिरा गांधींचं सरकार पडण्यासाठी प्रयत्न, पण....

Lok Sabha Election : संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर १९८१ मध्ये जेव्हा अमेठी जागेवर पोटनिवडणूक झाली तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या मोठा मुलगा ३७ वर्षीय राजीव गांधी यांना उमेदवारी दिली.
Lok Sabha Election News
Lok Sabha Election News

Lok Sabha Election News : सध्या देशात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यान जुने किस्से नव्याने सांगितले जात आहेत. १९८१ साली इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. १९७७ मध्ये पहिल्यांदाच काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचे ( मोरारजी देसाई त्यानंतर चौधरी चरण सिंह सरकार) पडल्यानंतर जानेवारी १९८० मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका झाल्या तेव्हा इंदिरा गांधी पुन्हा बहुमताने सत्तेत परतल्या. इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी अमेठी येथून निवडणूक जिंकले. पण खासदार बनल्यानंतर सहा महिन्यातचं २३ जून १९८० रोजी विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर १९८१ मध्ये जेव्हा अमेठी जागेवर पोटनिवडणूक झाली तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या मोठा मुलगा ३७ वर्षीय राजीव गांधी यांना उमेदवारी दिली. यानंतर राजकीय परिस्थीती वेगाने बदलत होती. अमेठी हा गांधी- नेहरू कुटुंबाचा गड मानला जातो, याची सुरूवात संजय गांधी यांच्यापासून झाली. तेव्हा राजीव गांधी निवडणूक प्रचारासाठी पत्नी सोनिया गांधी, यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह, त्यांच्या नात्यातील अरुण नेहरू, यूपी काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष बीएन पांडे आणि तरुण काँग्रेस सदस्यांनी खूप मेहनत घेतली होती.

Lok Sabha Election News
Popcorn Brain : सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार; काय आहेत लक्षणं अन् कसा करायचा बचाव?

दुसरीकडे विरोधी पक्षांना जेपी आंदोलनातील नेते शरद यादव यांना राजीव गांधींविरोधात निवडणूक मैदानात उतरवले होते. शरद यादव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला अमेठीला जायचे नव्हते पण माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी आग्रह केला. त्यांनी ज्योतिष्यावर खूप विश्वास होता. तेव्हा चौधरी आणि जनसंघ नेते नानजी देशमुख दोघे मिळून आम्हाला एका जोतिष्याकडे घेऊन गेले होते. त्यांचं म्हणणं होतं की राजीव गांधी निवडणूक हारले तर इंदिरा गांधी यांचं सरकार कोसळेल.

Lok Sabha Election News
Tata Motors: डिमर्जरच्या निर्णयानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स विक्रमी उच्चांकांवर; ब्रोकरेजचा काय आहे अंदाज?

मी नकार दिल्यानंतर आधी चौधरी साहेबांनी ऐकलं पण नानजी देशमुख मागेच लागले आणि जेव्हा मी निवडणूक लढवण्यास नकार दिली तेव्हा चौधरी चरण सिंह नाराज झाले आणि त्यांनी तुम्ही भित्रे आहेत. तुम्ही निवडणूक लढवली नाही तर मी लढेन. यानंतर मी निवडणुकीत उभा राहण्यास तयार झालो. चौधरी साहेबांनी माझ्यासाठी सर्व टीमसह तळ ठोकला होता.

पण या निवडणुकीत राजीव गांधी यांना विजय मिळाला. त्यांनी शरद यादव यांचा तब्बल २.३७ लाख मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत राजीव गांधी यांना २ लाख ५८ हजार ८८४ मते (८४.१८ टक्के) मिळाली होती. तर शरद यादव यांना फक्त २१,१८८ (६.८९ टक्के) मते मिळाली होती. या निवडणूकीत शरद यादव यांच्या विरोधात जातीवाचक घोषणा दिल्या जात होत्या. काँग्रेसचे कार्यकर्ते शरद यादव यांच्या विरोधात 'शरद यादव वापस जाओ, डंडा लेके भैंस चराओ' अशा घोषणा देत असत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com