लोकमान्य टिळक: टिळकांनी कारागृहात '5' महिन्यात पेन्सिलने लिहले होते 'गीता रहस्य'

पुढे शिक्षणसंस्थेसोबत टिळकांनी दोन स्वतंत्र वृत्तपत्रे देखील सुरू केले होते. त्यात 'केसरी' नावाचे एक मराठी वृत्तपत्र होतं आणि 'मराठा दर्पण' नावाचे दुसरे इंग्रजी वृत्तपत्र होते.
Lokmanya Tilak
Lokmanya TilakEsakal

बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे एका ब्राम्हण कुटुंबात 23 जुलै 1856 साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात त्यांचा जन्म झाला. टिळकांचे वडील त्यावेळी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तर संस्कृतचे अगाध ज्ञान त्यांना होते. वयाच्या 16 व्या वर्षीच टिळकांचे वडील वारले. त्यानंतर टिळकांच्या आई म्हणजे पार्वतीबाईनेच आपल्या मुलांचा सांभाळ केला. पुण्यातच टिळकांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या तर्कशास्त्र, वक्तशीरपणा आणि अचूक आणि सामान्य शब्दांमुळे त्यांना लोकमान्य म्हटले गेले.

लोकमान्य टिळकांच्या बालपणाच्या काळात इंग्रज हे क्रांती करणाऱ्या प्रत्येकाला क्रूरपणे दाबत होते. क्रांतीसाठी कुणीही आवाज काढू नये असे इंग्रजांना वाटत होते.

त्यामुळे ते क्रांतिकारक लोकांना आणि सशस्त्र लढ्यात सहभागी असलेल्या प्रत्येकांचा शोध घेऊन त्यांना एकत्रपणे फासावर लटकवत असत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा सामूहिक दडपशाहीमुळे टिळक बैचेन व्हायचे.या दडपशाहीच्या दृश्यांमुळे टिळकांच्या मनात लहानपणापासूनच संघटना, संघर्ष आणि हक्काची भावना दृढ होत गेली.

पुढे टिळकांनी जनजागृतीसाठी वृत्तपत्रे सुरू केले. खरे तर 1857 च्या उठावाच्या अपयशानंतर देशातील एक मोठा वर्ग इंग्रजांची शैली अंगीकारत होता. टिळकांना या गटाला सावध करायचे होते. त्यांनी त्यासाठी दक्षिण एज्युकेशन सोसायटी नावाच्या एका शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेत मुलांना आधुनिक पद्धतीच्या शिक्षणासोबत भारतीय विचार ही गोष्टसुध्दा प्रामुख्याने शिकवली जाऊ लागली .

पुढे शिक्षणसंस्थेसोबत टिळकांनी दोन स्वतंत्र वृत्तपत्रे देखील सुरू केले होते. त्यात 'केसरी' नावाचे एक मराठी वृत्तपत्र होतं आणि 'मराठा दर्पण' नावाचे दुसरे इंग्रजी वृत्तपत्र होते. या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि परकीय राजवटीचे दडपशाहीवर लेखण केलेले असायचे.

टिळकांनी 'गीता रहस्य' नावाच पुस्तक कसे लिहले?

पुढे टिळकांनी आपल्या इंग्रजाविरूद्ध मतभिन्नतेला विधाने किंवा सभांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी वृत्तपत्रांतुन लेखांची मालिकाही सुरू केली. ते रोज इंग्रज करत असलेल्या गुलामीवर लिहू लागले. या लिखाणामुळे त्यांच्यावर अनेक खटले दाखल झाले. त्यामुळे त्यांना अनेक वेळा शिक्षा आणि दंड देखील ठोठावण्यात आला. हे होऊनही ते लेख लिहतंच राहिले. परंतु इंग्रजांनी 1897 साली टिळकांवर देशद्रोहाचा गुन्हा करुन त्यांना 6 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या तुरुंगवासाच्या दरम्यान टिळकांनी 'गीता रहस्य' नावाच एक पुस्तक लिहिल. हे गीत रहस्य लिहून टिळकांनी देशाला कर्मयोगाची प्रेरणा दिली.

टिळकांनी केवळ पाच महिन्यांत पेन्सिलने गीता रहस्य लिहिले होते. पण एका क्षणी टिळकांना असे वाटले होते की ब्रिटिश सरकार आपले लेखन जप्त करेल. पण टिळकांचा आपल्या स्मरणशक्तीवरही तितकाच विश्वास होता. ते म्हणायचे की, पुस्तकातील प्रत्येक शब्द माझ्या मनात आहे. त्यामुळे मी ते पुन्हा कधीही लिहू शकेल.

Lokmanya Tilak
लोकमान्य टिळकांच्या नावावर राजकारण नको - कुणाल टिळक

नेमकं गीता रहस्य पुस्तकात काय आहे?

गीता रहस्य नावाचे पुस्तक लोकमान्य टिळकांनी मंडाले कारागृहात लिहलेले आहे. यामध्ये त्यांनी श्रीमद भागवत गीतेतील कर्मयोगाचे विस्तृत विवेचन केले. त्यांनी या पुस्तकात सांगितले आहे की, गीता चिंतन हे पुस्तक अशा लोकांसाठी नाही, जे स्वार्थी सांसारिक जीवन पुर्ण करून फावल्या वेळत हे पुस्तक वाचतील. तर हे पुस्तक अशा लोकांकरता आहे जे मुक्तीकडे लक्ष ठेवून सांसारिक कर्तव्ये कशी पार पाडावीत याचा विचार करतील. गीतेसारखा ग्रंथच मोक्ष मिळवून देतो हे मान्य करायला टिळक तयार नव्हते.

कारण गीतेत फक्त जग सोडून जाण्याचे आवाहन आहे. पण टिळकांना कर्म केंद्रस्थानी आणायचे होते. टिळकांचे स्पष्ट मत होते की आपला देश सध्या गुलामीत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही इथल्या लोकांशी मुक्तीची चर्चा करू शकत नाही तर प्रत्यक्ष कर्मावर तुम्ही भर दिला पाहिजे. ते कृतीत आणले पाहिजेत. टिळकांनीही हेच केले आणि गीतेचे रहस्य सर्व जगासमोर आणले.

महात्मा गांधीजीही गीतेचे मोठे प्रशंसक होते. ते गितेला आपल्या आईचा दर्जा देत होते. त्यांनी गीतारहस्यही वाचले होते आणि टिळकांनी गीतेवरील भाष्य हे त्यांचे चिरंतन स्मारक असल्याचे सांगितले होते.

Lokmanya Tilak
रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दारासाठी लोकमान्य टिळकांचा पुढाकार

शिवजयंती आणि गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनी केली.

टिकळांनी तुरुंगातून सुटल्यानंतर दोन उत्सव सुरू केले. पहिला शिवजयंती उत्सव आणि दुसरा गणेशोत्सव. टिळकांच्या लिखाणाने बुद्धीजीवी वर्गात तर क्रांती होतच होती पण या उत्सवांच्या आयोजनाने इतर सर्वसामान्य लोकांच्या मनात हळूहळू क्रांतीचे चैतन्य संचारू लागले होते. टिळकांनी या दोन्ही उत्सवाची सुरुवात मनोवैज्ञानिक पद्धतीने केली. म्हणजे समाजातील एक वर्ग धार्मिक भावनेने गणेशोत्सवाशी निगडीत होता आणि दुसरा वर्ग हा सांस्कृतिक व सामाजिक प्रवृत्तीचा होता, जो शिवजयंती उत्सवाशी निगडीत होता. टिळकांच्या या प्रयत्नांमुळे समाजातील प्रत्येक घटक हा क्रांतीसाठी जागृत झाला आणि आपोआपच स्वातंत्र्यलढ्याचे वातावरण निर्माण होऊ लागले. त्यावेळच्या वातावरणाचा परिणाम असा झाला की 1905 मध्ये टिळकजींनी देवनागरी ही सर्व भारतीय भाषांची लिंक भाषा बनवण्याची हाक दिली, तर देशभरातून त्याला पाठिंबा मिळाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी संस्था सुरू झाल्या.

"ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते"

टिळकांनी 1907 मध्ये पूर्ण स्वराज्याचा नारा दिला. भीक मागून स्वातंत्र्य मिळणार नाही, अशी टिळकांची विचारधारणा होती.

स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असा नारा देऊन ,पुढे त्यांनी 1908 मध्ये खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाको यांसारख्या सशस्त्र क्रांतिकारकांना उघडपणे पाठिंबा दिला. यामुळेच बंगाल आणि पंजाबचे क्रांतिकारी गट टिळकजींसोबत सामील झाले. टिळक 1916 मध्ये अॅनी बेझंटने स्थापन केलेल्या होमरूल सोसायटीमध्ये सामील झाले.1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. टिळकांच्या मृत्यूबद्दल गांधीजी म्हणाले की, "ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते". यावरून टिळकांचे व्यक्तिमत्व किती विशाल होते हे आपल्या लक्षात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com