प्रेमविवाह केला म्हणून नवविवाहितांची गोळ्या झाडून हत्या; मुलीच्या कुटुंबियांवर संशय

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 September 2020

मुलीचे वडील आणि भाऊ यांनी या दोघांवर गावठी बंदुकीने गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. संशयीत आरोपींनी व्हिडिओ कॉल करुन त्यांचे लोकेशन ट्रेस केल्याची माहिती देखील समोर येत आहे. 

प्रेम विवाहानंतर अवघ्या तीन एक महिन्यात पती-पत्नीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून मृत तरुणीच्या कुटुंबियांनीच हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. उत्तराखंडमधील काशीपूर येथे हा प्रकार घडला. पोलिस अधीक्षक राजेश भट्ट यांच्या नेतृत्वाखाली आरोपींचा शोध घेत आहेत.     

आता लग्नाची सीडीही पोलीस ठाण्यात द्यावी लागणार; कारण...

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोहल्ला अल्ली खान परिसरातील रहिवाशी असलेल्या मोहम्मद राशिद याने जवळपास तीन महिन्यांपूर्वी शेजारील घरातील नाजियाशी प्रेम विवाह केला होता. हा विवाह मुलीच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. विवाहानंतर कुटुंबियांच्या भीतीपोटी हे जोडपे बाहेरच राहत होते. पण एक महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांच्या सांगण्यावरुन ते घरी परतले होते. राशिद आपल्या नवविवाहित पत्नीसोबत आपल्या स्वत:च्या घरीच राहत होता.  

एल्गार परिषद प्रकरण : गोरखे आणि गायचोर यांना 'एनआयए'नं घेतलं ताब्यात!​

सोमवारी जवळपास रात्री 9 वाजता पती-पत्नी दुचाकीवरुन औषध घेऊन घरी परतत असताना एका चौकात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मुलीचे वडील आणि भाऊ यांनी या दोघांवर गावठी बंदुकीने गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. संशयीत आरोपींनी व्हिडिओ कॉल करुन त्यांचे लोकेशन ट्रेस केल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच  एएसपी राजेश भट्ट, सीओ मनोज ठाकुर, एसएसआय सतीश चंद्र कापडी घटनास्थळी दाखल झाले. दोघांच्या मृतदेहाभोवती जमा झालेल्या गर्दीला पांगवत पोलिसांनी त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love marriage matter father shot dead his daughter and son in law