esakal | एल्गार परिषद प्रकरण : गोरखे आणि गायचोर यांना 'एनआयए'नं घेतलं ताब्यात!
sakal

बोलून बातमी शोधा

NIA

गोरखे याला दर रविवारी वाकड पोलिस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काल रविवारी (ता.६) तो आला नसल्याचे समजते.

एल्गार परिषद प्रकरण : गोरखे आणि गायचोर यांना 'एनआयए'नं घेतलं ताब्यात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी असलेल्या आणि जमावाला भडकाविल्याच्या आरोपाखाली कबीर कला मंचचे सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी (ता.७) ताब्यात घेतले आहे. एनआयएकडे तपास गेल्यानंतर या प्रकरणात त्यांनी केलेली ही पहिलीच अटक आहे.

अॅम्बुलन्स न मिळाल्याने पुण्यात मनसेचे 'खळ्ळ-खट्याक'!​

केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास जानेवारीमध्ये एनआयएकडे सोपविण्यात आला होता. 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या परिषदेच्या माध्यमातून जमावाला भडकाविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे पोलिसांकडे तपास असताना 17 एप्रिल 2018 रोजी पुणे पोलिसांनी पुणे, मुंबई आणि नागपूर येथे एकाचवेळी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घातले होते. त्यात वाकड येथील सागर गोरखे याच्या घरातून पोलिसांनी सीडी, पुस्तके, पेन ड्राईव्ह अशा वस्तू जप्त केल्या होत्या. पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

भारतीय रेडिओ खगोलशास्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप काळाच्या पडद्याआड​

दरम्यान, गोरखे याला दर रविवारी वाकड पोलिस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काल रविवारी (ता.६) तो आला नसल्याचे समजते. तसेच या दोघांच्या मुंबईतील वकिलांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे. मात्र, एनआयएकडून अद्याप त्यांच्याविषयीही काहीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी मुंबईतील एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींवर देशद्रोहाचे कलम लावण्यात आलेले नाही.

कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...

या एफआयआरमध्ये एकूण 11 जणांची नावं असून त्यापैकी नऊ जण सध्या तुरुंगात आहेत. या सर्वजणांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सुधीर प्रल्हाद ढवळे, शोमा सेन, महेश सीताराम, महेश सीताराम राऊत, रोना विल्सन, सुरेंद्र पुंडलिक गडलिंग, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, अरूण फरेरा, वरनॉन गोन्सालविज आणि आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top