अलविदा दुनिया, हमेशा के लिए...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

आमचे एकमेकांवर प्रेम आहे. पण, आमचा विवाह होऊ शकत नाही. दोघेही जगाचा निरोप घेणार आहोत. फक्त आमच्या दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करा, एवढीच शेवटची इच्छा आहे.

मोगा (पंजाब): आमचे एकमेकांवर प्रेम आहे. पण, आमचा विवाह होऊ शकत नाही. दोघेही जगाचा निरोप घेणार आहोत. फक्त आमच्या दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करा, एवढीच शेवटची इच्छा आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. दोघांचा अत्यंत भावनिक व्हिडिओ आहे.

वहिणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले म्हणून...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅपी सिंह (वय 25) याचे नेहा सोबत प्रेमसंबंध होते. नेहा बारावीमध्ये शिक्षण घेत होती तर हॅपी चालक म्हणून काम करत होता. गुरुवारी (ता. 6) रात्री दोघे एकमेकांना भेटले व त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापू्र्वी त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून ठेवला. यानंतर दोघांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रियकर म्हणाला प्रेयसीला दुध प्यायचा का अन्...

दोघांच्या आत्महत्येबाबतची माहिती समजल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोघांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याजवळी मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, त्यांनी एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्डिंग तयार करून ठेवला आहे. शेवटी अलविदा दुनिया, हमेशा के लिए... असे म्हटले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तुझ्यावर खूप प्रेम करतोय; हो बोल म्हणाला अन्....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover couple suicide in punjab