esakal | एकमेकांना मारली मिठी अन् केले फेसबुक लाईव्ह...
sakal

बोलून बातमी शोधा

lovers commits suicide make live video on social media in madhya pradesh

दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि फेसबुक लाईव्ह सुरू करून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

एकमेकांना मारली मिठी अन् केले फेसबुक लाईव्ह...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पन्ना (मध्य प्रदेश) : दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि फेसबुक लाईव्ह सुरू करून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

मैत्रिणीला फिरायला घेऊन इटलीला गेला अन्...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युवतीने ओढणी झाडाला बांधली. एकमेकांना मिठी मारत गळफास घेतला. दोघांनी एकमेकांच्या मिठीतच जीव सोडला. यावेळी फेसबुक लाईव्ह सुरू होते. पन्ना शाहनगर पोलिस स्टेशन परिसरातील देवरी पिपरिया गावात ही घटना घडली आहे.

हॉटेलवर छापा टाकताच प्रेमी युगुलांची पळापळ...

गावातील अरुण पाल (वय 20) आणि खुशी (वय 19) यांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, दोघे वेगवेगळ्या जातीमधील असल्याने दोघांच्या विवाहाला विरोध होता. यामुळे खुशीचा 25 फेब्रुवारी रोजी दुसऱया युवकासोबत विवाह लावण्यात आला होता. खुशी होळीसाठी माहेरी आली होती. गावात आल्यानंतर पुन्हा दोघांची भेट झाली. दोघांना प्रेमाचा विरह सहन न झाल्यामुळे आत्महत्येचा विचार केला. गावामधील झाडीमध्ये गेल्यानंतर त्यांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली.

प्रेयसीला लॉंग ड्राईवला फिरायला घेऊन गेला अन्...

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतेदह खाली उतरवल्यानंतर शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्री पत्नी लागली तडफडायला...