Loksabha Election 2024 : 'बसपा'कडून 16 उमेदवारांची घोषणा; यादीमध्ये 7 मुस्लिम नावांचा समावेश

BSP Candidate List : येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने रविवारी १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बसपाचे राष्ट्रीय महासचिव मेवालाल गौतम यांनी ही यादी घोषित केली आहे. पक्षाने सहारनपूर येथून माजिद अली यांना तिकीट दिलं आहे. तर अमरोहा जागेसाठी मुजाहिद हुसैन यांना पक्षाने संधी दिली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 esakal

BSP Candidate List : येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने रविवारी १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बसपाचे राष्ट्रीय महासचिव मेवालाल गौतम यांनी ही यादी घोषित केली आहे. पक्षाने सहारनपूर येथून माजिद अली यांना तिकीट दिलं आहे. तर अमरोहा जागेसाठी मुजाहिद हुसैन यांना पक्षाने संधी दिली आहे.

बहुजन समाज पार्टीने तब्बल सात मुस्लिम उमेदवारांना मैदानामध्ये उतरवलं आहे. या नावांमध्ये मुरादाबादहून इरफान सैफी, रामपूरहून जीशान खान, संभलहून शौलत अली, आंवला मतदालसंघातून आबिद अली, पीलीभीतच्या जागेवरुन अनील अमहद खान उर्फ फूलबाबू यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Loksabha Election 2024
Lok Sabha Election: ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना! जागावाटपाचा पेच सुटणार की ‘वंचित’लाच सोडावे लागणार?

बसपाने रविवारी १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केराना येथून श्रीपाल सिंह, मुजफ्फरनगरहून दारा सिंह प्रजापती, बिजनौर मतदारसंघातून विजेंद्र सिंह, नगीना (एससी) मतदारसंघातून सुरेंद्र पाल सिंह, मुरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद इरफान सैफी, रामपूर मतदारसंघातून जीशान खान, संभल मतदारंशातून शौलत अली.

Loksabha Election 2024
Lok Sabha Elections 2024 : CM केजरीवाल यांच्या अटकेवरुन INDIA आघाडीची एकजूट; 31 तारखेला महारॅली

तसेच मेरठमधून देववृत्त त्यागी, बागपत मतदारसंघातून प्रवीण बंसल, गौतमबुद्ध नगरमधून राजेंद्र सिंह सोळंकी, बुलंदशहर मतदारसंघातून गिरीश चंद्र जाटव, आंवलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनिस अमहद खान, शाहजहांपूरमधून डॉ. दोदराम वर्मा यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com