
Lucknow building collapse: इमारतीचा मालक असलेल्या आमदाराच्या मुलाला अटक
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील वजीर हसन परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीघांचा मृत्यू झाला आहे. अजुनही बचाव कार्य सुरु आहे. आत्तापर्यंत १५ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, इमरतीचा मालक असलेल्या सपा आमदाराच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. (Lucknow building collapse sp mla shahid mansoor son nawazish mansoor taken into custody)
गेल्या १२ तासांपासून बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली 3 जण अडकले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांशी सतत चर्चा सुरू आहे. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
दुसरीकडे, सपाचे किठोर आमदार आणि इमारतीचे मालक माजी कॅबिनेट मंत्री शाहिद मन्सूर यांचा मुलगा नवाजीश मन्सूर याला ताब्यात घेण्यात आले.
मंगळवारी दुपारी भूकंपानंतर काही तासातच इमारत कोसळली. यानंतर तातडीने पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहचले. NDRF, SDRF यांची टीम पोहचली आहे. तसेच ढिगाऱ्याखाली 30 ते 40 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.