esakal | होम क्वॉरंटाईन बाप-लेकाचा मृत्यू; हातोड्यानं तोडला दरवाजा

बोलून बातमी शोधा

होम क्वॉरंटाईन बाप-लेकाचा मृत्यू; हातोड्यानं तोडला दरवाजा

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी होत असलेली गर्दी पाहता सरकारकडून देण्यात येणाऱ्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

होम क्वॉरंटाईन बाप-लेकाचा मृत्यू; हातोड्यानं तोडला दरवाजा

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

लखनऊ - उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर मृत्यूची संख्याही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. लखनऊमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी होत असलेली गर्दी पाहता सरकारकडून देण्यात येणाऱ्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांना उपचार न मिळाल्यानं ते घरांमध्येच मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. लखनऊमधील कृष्णान नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाप लेकाचा घरातच मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कृष्णा नगरमधील एलडीए कॉलनीतील सेक्टर सी-1 मध्ये एका घरात बाप लेक घरातच क्वारंटाइन होते. अरविंद गोयल आणि त्यांचा 25 वर्षांचा मुलगा ईलू गोयल अशी त्यांची नावे आहेत. जेव्हा शेजाऱ्यांना दुर्गंध पसरल्याचं जाणवलं तेव्हा घरात मृतदेह असल्याची माहिती समोर आली. यानंतर धक्का बसलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घराचे दार हातोड्यानं तोडून आत प्रवेश केल्यानंतर दोन मृतदेह आढळले. तर पत्नी गंभीर अवस्थेत होती. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.

हेही वाचा: कोण आहेत अखिल गोगोई? तुरुंगातून भाजपला देतायत टक्कर

कोरोना झाल्यानंतर तिघेही होम क्वारंटाइन होते. तिथेच ते उपचार घेत होते. दिव्यांग असल्यानं महिलेला चालता येत नव्हत. पती आणि मुलाच्या मृत्यूवेळी महिलेनं आरडाओरडा केला पण घरातून बाहेर तो गेलाच नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी अरविंद गोयल यांना घरामध्ये पाहण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर ते दिसले नव्हते. कोरोनाच्या भीतीने संपूर्ण परिसर सामसूम होता. त्यामुळे त्यांच्या हालचाली समजू शकल्या नाहीत. कृष्णनगर पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, या कुटुंबातील इतर सदस्यांबाबत काही माहिती नाही. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार पोलिसांकडून करण्यात येत आहेत. तर महिलेवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

हेही वाचा: West Bengal Election: भाजपचे 3 दिग्गज पिछाडीवर

आणखी एकाचा मृत्यू

कृष्णा नगरमधील सेक्टर डी 1 मधील एका घरात आणखी एक मृतदेह सापडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव विवेक शर्माच असं आहे. विवेक शर्मासुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होता आणि घरीच उपचार सुरु होते. त्याच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. त्यानंतर नातावाईकांनी विवेक शर्मा यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना कळवली होती.

.