Madhu Dandavate : अधिकारी मंत्रीपद घेऊन आले अन् मधु दंडवतेजी कपडे धुवत होते!  

तेव्हा मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार असलेला वैयक्तीक कामात व्यस्त होता.
madhu dandvate
madhu dandvateesakal
Updated on

व्हीपी हाऊसच्या 403 नंबर रुममध्ये दोघे मित्र रहायचे. त्यातील एकाला राजकारणाची भलतीच आवड. राजकारणात कोणी पडले तर ते मोठ्या पदाच्या आशेने. पण, या व्यक्तीच्या बाबतीत तसे नव्हते. त्याला ना पदाची अपेक्षा होती ना सत्तेची हाव. याच व्यक्तीसाठी 403 मध्ये काही अधिकारी मंत्रीपद मिळाल्याची वार्ता घेऊन आले. दरवाजा उघडणाऱ्या कार्यकर्त्याला अधिकारी आणि नेते मंडळींनी मधु दंडवते कुठे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा कार्यकर्त्यानं मधु दंडवते हे तर बाथरुमध्ये आहेत.

या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. जेव्हा मंत्रिपदासाठी इतर मंत्री लॉबिंग करत होते, तेव्हा मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार असलेला वैयक्तीक कामात व्यस्त होता. अधिकाऱ्यांनी बाथरुमच्या दिशेने पाहिले तर बाथरुमचा दरवाजा उघडाच होता आणि दरवाजातून कपडे धुण्याचा आवाज येत होता.मंत्री होणारा हा व्यक्ती त्यांच्यासमोर स्वत:चेच कुर्ते हाताने धुत होता.  त्या व्यक्तीचे नाव होते मधु दंडवते.

madhu dandvate
Viral Video : जावईबापूला टस्सल, सासरेबुवांचा सिक्सर!; अन्नाच्या बॅटिंगवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

कोणाची तरी चाहुल लागल्याने मधु दंडवते बाहेर आले आणि म्हणाले की, निवडणुकीच्या धामधुमीत सगळेच कपडे खराब झाले होते. धुवायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून आता कपडे धुवायाला बसलोय. त्यावेळी कपडे धुवत असलेल्या मधु दंडवते यांना कुठे माहीत होतं की थोड्या वेळानं आपल्याला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे.

आलेल्या अधिकाऱ्यांनी मधुजींना मंत्रीपद मिळाले असून, काही वेळातच तूम्हाला शपथ घ्यायची आहे, असे सांगितले. मोरारई देसाई यांच्या मंत्रिमंडळात मधु दंडवते रेल्वे मंत्री बनले. आज याच साध्या माणसाचा स्मृतिदीन.

madhu dandvate
Shiv Sena Symbol Row: 'धनुष्यबाणा'चा पेच कायम? निकाल आजही नाहीच; 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी

मधुजींचा जन्म २१ जानेवारी १९२४ रोजी झाला. ‘साधी राहणी, उच्च विचारसणी’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मधूजी. त्यांनी भौतिकशास्त्रात एम.एस्सीची पदवी संपादन केली. मुंबईच्याच सिद्धार्थ महाविद्यालयाचे ते उपप्राचार्य आणि फिजिक्स विभागाचे विभागप्रमुख होते.

madhu dandvate
Agniveer Fake Recruitment: 'अग्निवीरां'ची बनावट भरती! माजी सैनिकानं घातला लाखोंचा गंडा

१९४२च्या स्वातंत्र्य लढ्यावेळी ते स्वातंत्र्य चळवळीत उतरले. गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणीच्या धोपटशाहीविरुद्धचा लढा अशा अनेक प्रसंगी हा समाजवादी सैनिक  प्रत्येक लढ्यात अग्रभागी होता. या चळवळींमूळे त्यांना अनेकदा तुरूंगवासही झाला. पण मागे हटले नाहीत.

madhu dandvate
Savitribai Phule Birth Anniversary: आंतरजातीय प्रेम करणाऱ्या जोडप्याचं प्राण वाचवण्यासाठी सावित्रीबाईंनी ही युक्ती वापरली

अर्धशतकाहून अधिक काळ राजकारण व समाजकारणात सक्रिय असलेल्या मधुजींची एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ख्याती होती. १९७१ ते १९९० एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

१९७८ साली जनता पक्षाच्या राजवटीत रेल्वेमंत्री, १९८९ साली व्ही. पी. सिंग सरकारमध्ये अर्थमंत्री आणि १९९० साली देवगौडा पंतप्रधान असताना नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले होते. ध्येयवादी, स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून दिल्लीत इतर राजकीय नेत्यांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप होती. 

madhu dandvate
PM Modi-BBC Row: मोदींची बदनामी! भारताच्या आक्षेपानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मांडली भूमिका

रेल्वेत आधी लाकडी फळ्याच असायच्या. त्यावर मऊसूत गादी बसवण्याचे कामही मधुजींचीच देण आहे. १९७७मध्ये दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. रेल्वेमंत्री असतानाच त्यांनी कोकणात रेल्वे नेण्याचे काम केले.

madhu dandvate
Arun jaitley Birth Anniversary : गुजरातमधील या गावाशी अरूण जेटलींचे खास नाते; अस्थी विसर्जनही तिथेच केले!

मधू दंडवते यांचे १२ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झाले. मधू दंडवते यांनी दहनाऐवजी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मृत्युनंतर जे. जे. हॉस्पिटलला त्यांचा देहदान करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com