Madhubani ASI Firing : गावकऱ्यांनी महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले; पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार, एका ग्रामस्थाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Balirajgarh Shooting : आरोपी पोलीस अधिकारी पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. अधिकाऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Madhubani ASI Firing Incident in Balirajgarh

Madhubani ASI Firing Incident in Balirajgarh

essakal

Updated on: 

Madhubani ASI Firing Incident in Balirajgarh : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बाबुबरही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलिराजगड येथे ही धक्कादायक घटना घडली. एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्यानंतर ग्रामस्थ आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. या वादातून अधिकाऱ्याने सर्व्हिस पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...