मुलगी झाली हो! आनंदाच्या भरात मालकानं ग्राहकांना दिलं Extra पेट्रोल

Madhya Pradesh
Madhya Pradeshesakal
Summary

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे (Petrol Diesel Price Hike) देशातल्या नागरिकांवर अधिकच बोजा पडला आहे.

मध्य प्रदेश : वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे (Petrol Diesel Price Hike) देशातल्या नागरिकांवर अधिकच बोजा पडला आहे. वाढत्या किंमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या वर गेल्या आहेत. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरपर्यंत किंमती वाढतच आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल येथील पेट्रोल पंप ऑपरेटर ग्राहकांना 5 ते 10 टक्के अतिरिक्त पेट्रोल देत आहे. याचं कारण सण नसून कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यामुळं ग्राहकांना जादा पेट्रोल-डिझेल दिलं जात आहे. सध्या वाढत्या महागाईमुळं ग्राहकांना या पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या एक्स्ट्रा पेट्रोलमधून थोडा दिलासा मिळालाय.

मुलाच्या जन्मावर सर्वच जण आनंद साजरा करतात, पण काही लोक असे आहेत ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली, की त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. बैतूलचे सैनानी कुटुंब याचं उत्तम उदाहरण आहे. सैनानी कुटुंबात मुलीचा नुकताच जन्म झाला आणि या मुलीचं स्वागत करताना, सैनानी कुटुंबानं त्यांच्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना एक्स्ट्रा पेट्रोल देण्याचं ठरवलं.

Madhya Pradesh
सर्वात जास्त मुलं असणाऱ्या पालकांना क्रीडामंत्र्यांनी दिलं इतकं 'बक्षीस'
Madhya Pradesh
Madhya Pradesh

बैतूलच्या राजेंद्र सैनानी (Rajendra Sainani) यांची भाची शिखा हिने 9 ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. नवरात्रीत मुलगी जन्माला आल्याने सैनानी कुटुंबीय खूपच आनंदित आहे. या मुलीचा जन्म अविस्मरणीय करण्यासाठी सैनानी कुटुंब 13 ऑक्टोबरपासून त्यांच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांसोबत आनंदात साजरा करत आहे. आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक्स्ट्रा पेट्रोल दिलं जात आहे.

Madhya Pradesh
भारत सहाव्यांदा बनला UNHRC चा सदस्य; मिळाली 'इतकी' मतं

पेट्रोल पंप ऑपरेटर राजेंद्र सैनानी म्हणाले, आपण पुत्र जन्माचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो, पण माझ्या भाचीला मुलगी झालीय, याबद्दल आम्ही ग्राहकांसोबत आनंद साजरा करत आहे. त्यामुळेच आम्ही दररोज 3 दिवसांसाठी ग्राहकांना एक्स्ट्रा पेट्रोल देत आहे. 100 रुपयांचं पेट्रोल घेतल्यावर 105 रुपयांचं पेट्रोल देत आहोत, तर 100 रुपयांच्या वर आणि 500 ​​रुपयांपर्यंतच्या पेट्रोलवर 10% अतिरिक्त पेट्रोल दिलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com