मध्य प्रदेशात कमलनाथांच्या मदतीला कोरोना धावला; काय घडले सभागृहात?

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 मार्च 2020

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार आज, कोसळणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. भाजपकडून सरकार पाडण्याची सर्व तयारी झाली होती.

भोपाळ Coronavirus : मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेससोडून भाजपचा झेंडा हाती घेतल्यामुळं ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील आमदार, मंत्री फुटले आहेत. त्यामुळं काठावरचं बहुमत असलेलं कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. पण, आता कोरोना व्हायरस मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मदतीला धावून आलाय. आज, विधानसभेच्या सभागृहात फ्लोअर टेस्ट होणार होती. पण, ती आता 26 मार्चपर्यंत टळली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानसभा सदस्यांना सॅनिटायझर आणि मास्क
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार आज, कोसळणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. भाजपकडून सरकार पाडण्याची सर्व तयारी झाली होती. पण, देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. त्यातच मुख्यमंत्री कमलनाथ यांना कोणत्याही परिस्थितीत फ्लोअर टेस्ट टाळायची होती आणि त्यासाठी आज कोरोना व्हायरसचे निमित्त मिळाले होते. विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती कोणत्यातरी कारणाने फ्लोअर टेस्ट पुढे ढकलतील, अशी शंका व्यक्त केली जात होता. त्याच प्रमाणे प्रचापती यांनी निर्णय दिला. यामुळं आता काँग्रेसला आपल्या नाराज मंत्री आणि आमदारांची मनधरणी करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा वेळ मिळणार आहे. ज्या वेळी आमदार सभागृहात आले. त्यावेळी त्यांना सॅनिटायझर आणि मास्क पुरवण्यात आले होते.

आणखी वाचा - कोरोनामुळं नोकऱ्या जाणार, या क्षेत्राला मोठा फटका

राज्यपालांची सूचना 
महाराष्ट्राप्रमाणेच फ्लोअर टेस्टवरून मध्य प्रदेशात वाद सुरू आहे. राज्यपाल विरुद्ध सरकार, असा सामना रंगला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लाल जी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी आवाजी मतांनी मतदान घेण्याची सूचना केली आहे. भाजपने या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार केली होती. भाजपने ईव्हीएममशीन खराब असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन राज्यपालांनी काँग्रेसला आवाजी मतांनी विश्वास दर्शक ठराव घेण्याची सूचना केलीय.

आणखी वाचा - युरोपमध्ये का वाढतायत कोरोनाचे बळी? वाचा सविस्तर बातमी

काँग्रेसचा आरोप
काँग्रेसचे नाराज आमदार आणि मंत्री सध्या बेंगळुरूमध्ये आहेत. त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं असलं तरी, त्यातील काही जण परतण्याच्या तयारी आहेत. पण, त्यांना बाहेर पडू दिलं जात नाहीय. असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. काँग्रेसचे मंत्री पी. सी. शर्मा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केलाय. 

आणखी वाचा - पुण्यात आठ ठिकाणी संचारंबदीची शक्यता; वाचा बातमी

भाजप सुप्रीम कोर्टात
काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी मध्य प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष प्रजापती यांनी विश्वासदर्शक ठराव पुढे ढकलला आहे. आता येत्या 26 मार्च रोजी मध्य प्रदेश विधानसभेत फ्लोअर टेस्ट होणार आहे. पण, या विरोधात भाजपने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यामुळं मध्य प्रदेशातील सत्तासंघर्ष आता सुप्रीम कोर्टाच्या दारात गेलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh coronavirus impact kamal nath government floor test extended 26 march