esakal | आता सरकार दारु घरपोच देणार; Online विक्रीला परवानगीची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

smadhya pradesh liquor

डिजिटल इंडिया आणि कोरोनाच्या याकाळात आता मध्य प्रदेश सरकार ऑनलाइन दारु विक्री कऱण्याची शक्यता आहे. राज्यात दारुच्या ऑनलाइन विक्रीला मंजुरी देण्याची तयारी केली जात आहे.

आता सरकार दारु घरपोच देणार; Online विक्रीला परवानगीची शक्यता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भोपाळ - डिजिटल इंडिया आणि कोरोनाच्या याकाळात आता मध्य प्रदेश सरकार ऑनलाइन दारु विक्री कऱण्याची शक्यता आहे. राज्यात दारुच्या ऑनलाइन विक्रीला मंजुरी देण्याची तयारी केली जात आहे. वाणिज्य कर विभागाने एक प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालायकडे पाठवला आहे. याला मंजुरी मिळताच प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. 

दारुचा अवैध व्यवसाय रोखण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी मध्य प्रदेश सरकार ऑनलाइन विक्रीची तयारी करत आहे. राज्यातील मंत्री जगदीश देवरा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार दारुच्या ऑनलाइन विक्रीवर सरकार विचार करत आहे. यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. सरकार आता कस्टम ड्युटीमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकारचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि दारुच्या अवैध व्यवसायाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

हे वाचा - 'भाजप कोरोनापेक्षा अधिक धोकादायक'; नुसरत जहाँ यांच्या विधानावर भाजप भडकली

मंत्री जगदीश देवरा यांनी सांगितलं की, राज्यात नकली दारु आणि अवैध व्यवसाय रोखण्यासाठी आता अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. अवैध दारुचा व्यवसायाची तक्रार मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे. जर काही घडलं तर त्याला अधिकारी जबाबदार असतील. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं. मुरैना इथं बनावट दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. 

'फिर मिलेंगे!'; शेतकरी आणि सरकारमधील ९वी बैठकसुद्धा निष्फळच!​

इतर राज्यांच्या तुलनेत दारु जास्त दराने विकणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळेच शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. छत्तीसगढमध्ये ऑनलाइन विक्री आधीपासूनच होत आहे. त्यावर मध्य प्रदेश सरकार अभ्यास करत आहे. छत्तीसगढमध्ये दारुच्या ऑनलाइन विक्रीचा चांगला परिणाम दिसून आल्यानं मध्य प्रदेशही तीच प्रणाली अवलंबण्याची शक्यता आहे. 

loading image