Coronavirus : नवरा घरामध्ये क्वारंटाईन; अन् बायको प्रियकरासोबत...

वृत्तसंस्था
बुधवार, 27 मे 2020

मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. बेपत्ता झालेली महिला तीन मुलांची आई असून पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरु केला आहे.

भोपाळ : नवरा क्वारंटाइनमध्ये असताना बायको मात्र, प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. मध्यप्रदेशातील एका स्थलांतरित मजुराने पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवली आहे. मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. बेपत्ता झालेली महिला तीन मुलांची आई असून पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरु केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तक्रार दिलेली व्यक्ती घरामध्ये पहिल्या मजल्यावर क्वारंटाईन करण्यात आलेली होती. तर, पत्नी आणि मुले तळ मजल्यावर राहत होती. सकाळी तो दरवाजा उघडायला गेला, त्यावेळी घराचा दरवाजा बाहेरुन बंद करण्यात आलेला होता. कसाबसा तो रुमच्या बाहेर आला, त्यावेळी पत्नी कुठेही दिसत नव्हती. मुलांना सुद्धा त्यांची आई कुठे गेली आहे हे माहित नव्हते. पत्नी गायब असल्ययाचे लक्षात आल्यावर त्या मजुराने चेहऱ्याभोवती चादर गुंडाळली व शेजारी, नातेवाईकांच्या दारावर जाऊन पत्नीला कुठे पाहिले का? म्हणून चौकशी केली परंतु, तिचा कुठेही पत्ता लागला नाही, त्यानंतर त्यांने पोलिसांत तक्रार केली आहे.
-----
पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
-------
भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट
-------
दरम्यान, ५० वर्षीय मजूर १९ मे रोजी मुंदेरीमधील आपल्या गावी पोहोचला. दिल्लीमध्ये एका बांधकाम साईटवर तो काम करायचा. पत्नी आणि मुले त्याच्यासोबतच राहत होती. पण दीडवर्षांपूर्वी पत्नी मुलांना घेऊन गावी निघून आली. श्रामिक स्पेशन ट्रेनने तो गावी पोहोचल्यानंतर त्याला घरामध्येच १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांनंतर सदरील प्रकार घडला आहे. मजुराने नोंदवलेल्या तक्रारीमध्ये हे सर्व म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh: Man in quarantine wife elopes with lover

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: