मध्य, उत्तर प्रदेशमध्येही पोटनिवडणुका; शिवराजसिंह यांचे भवितव्य दहा नोव्हेंबरला ठरणार

ज्योतिरादीत्य शिंदे-शिवराजसिंह चौहान.
ज्योतिरादीत्य शिंदे-शिवराजसिंह चौहान.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह 11 राज्यांमधील विधानसभेच्या 56 जागांसाठी आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या या पोटनिवडणुकांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान होईल. तर बिहारमधील लोकसभेच्या रिक्त जागेसाठी सात नोव्हेंबरला मतदान होईल. या सर्व जागांसाठी मतमोजणी 10 नोव्हेंबरला होईल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार छत्तीसगढ, तेलंगण आणि हरियानातील प्रत्येकी एक, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, नागालँड आणि ओडिशा या राज्यातील प्रत्येकी दोन, उत्तर प्रदेशातील सात, गुजरातमधील आठ आणि मध्य प्रदेशातील 28 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहे. तर बिहारमधील वाल्मिकी नगर लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूकही याचसोबत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत जिंकलेले संयुक्त जनता दलाचे खासदार वैद्यनाथ प्रसाद महातो यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. या सर्व पोटनिवडणुकांसाठीही निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून कोरोना साथीपासून निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या बचावासाठी मतदान केंद्रांवर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ह्ज यासारख्या साहित्याची व्यवस्था केली जाणार आहे.

ऐन कोरोना संकटात कमलनाथ सरकार उलथून पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळविलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तास्थैर्यासाठी या पोटनिवडणुका निर्णायक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काॅंग्रेसमधून बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळले होते. हे सर्व समर्थक आमदार राजीनामा दिल्यानंतर भाजपतर्फे आता पुन्हा नशीब आजमावत आहे.

मध्य प्रदेशातील बलाबल
230 संख्याबळ असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेमध्ये बहुमताचा जादुई आकडा  116 आमदारांचा आहे. भाजपकडे 107 आमदार आहेत. तर विरोधात असलेल्या काॅंग्रेसकडे 88, बहुजन समाज पक्षाकडे 2 आणि समाजवादी पक्षाकडे 1 आमदार आहे. या व्यतिरिक्त 4 अपक्ष आमदार आहेत. भाजपला सत्ता टिकविण्यासाठी 9 आमदारांची आवश्यकता असून काॅंग्रेसला सत्तेत पुनरागमनासाठी सर्व 28 जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील चुरस वाढली आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com