Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Karur stampede incident Update : ... यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
Madras High Court delivers a statement to actor Vijay Thalapathy over the Karur stampede tragedy in Tamil Nadu.

Madras High Court delivers a statement to actor Vijay Thalapathy over the Karur stampede tragedy in Tamil Nadu.

esakal

Updated on

Madras High Court’s Observation on Karur Stampede : मद्रास उच्च न्यायालयाने करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके नेत्यांना कडक शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की पक्षाचे नेते विजय थलपती चेंगराचेंगरीनंतर घटनास्थळावरून पळून गेले आणि पक्षाने त्याबद्दल दुःखही व्यक्त केले नाही. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते.

 करूर येथे विजयच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी देखील झाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितांची भेट घेतली आणि त्यानंतर भरपाईची घोषणा केली होती.

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने म्हटले आहे की, प्रशासन विजय थलपतींबद्दल उदारतेने वागत आहे. तसेच, खंडपीठाने घटनेची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी आसरा गर्ग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आणि टीव्हीके नेते बस्सी आनंद आणि सीटीआर निर्मल कुमार यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला.

Madras High Court delivers a statement to actor Vijay Thalapathy over the Karur stampede tragedy in Tamil Nadu.
Vijay Thalapathy Video : ''मुख्यमंत्रीजी, जर तुम्हाला बदलाच घ्यायचा असेल तर, मला.." ; विजय थलपतींचं थेट आव्हान!

पूर्व जामिनाच्या सुनावणीत, राज्य सरकारने असा युक्तिवाद केला की चेंगराचेंगरी पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे झाली आणि नेते बेजबाबदारपणे वागले होते. खंडपीठाने म्हटले की, न्यायालय "डोळे बंद करू शकत नाही, मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही किंवा जबाबदारी झटकू शकत नाही. संपूर्ण जगाने ही घटना आणि त्याचे परिणाम पाहिले आहेत. दुचाकी वाहन टीव्हीकेच्या बसखाली अडकले होते, तरीही चालकाने हे सर्व पाहूनही गाडी थांबवली नाही. हा हिट-अँड-रनचा गुन्हा नाही का? हिट-अँड-रनचा गुन्हा का नोंदवला गेला नाही? पोलिसांनी त्याची दखल का घेतली नाही?

याशिवाय, टीव्हीके नेते आधाव अर्जुन यांच्या वादग्रस्त पोस्टबाबत न्यायालयाने कडक शब्दांत विचारले, "आधाव अर्जुन कायद्यापेक्षा वर आहे का? न्यायालय निर्देश देईल तेव्हाच तुम्ही कारवाई कराल का?" न्यायालयाने आता आधाव अर्जुनविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Madras High Court delivers a statement to actor Vijay Thalapathy over the Karur stampede tragedy in Tamil Nadu.
Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

विजय थलपतींचं मुख्यमंत्री स्टॅलिन यांना आव्हान -

याचबरोबर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना आव्हान देत, विजय थलपती यांनी त्यांच्या समर्थकांऐवजी स्वतःला समोर केलं होतं आणि म्हटलं होतं, "मुख्यमंत्री महोदय, जर तुम्हाला बदला घ्यायचा असेल, तर मला जे काही करायचे आहे ते करा. त्यांना हात लावू नका. मी घरी असेन किंवा माझ्या कार्यालयात असेन, माझ्याबरोबर हवं ते करा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com