esakal | Video : आता 'जेम्स बाँड'ही बोलू लागला मराठी; पाहा भन्नाट ट्रेलर!
sakal

बोलून बातमी शोधा

James_Bond

मराठीप्रमाणेच या चित्रपटाचा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे.

Video : आता 'जेम्स बाँड'ही बोलू लागला मराठी; पाहा भन्नाट ट्रेलर!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

हॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेगने साकारलेलं आणि जगभर लोकप्रिय झालेलं पात्र म्हणजे जेम्स बाँड. या जेम्स बाँडने जगभरातील अनेक सिनेरसिकांचं मनोरंजन केलं आहे. या जेम्स बाँड सीरिजमधला २५ वा चित्रपट 'नो टाइम टू डाय' येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'नो टाइम टू डाय' या चित्रपटाचा इंग्रजी भाषेतील ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट इंग्रजीसोबत आणखी १० प्रादेशिक भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याची माहिती बॉलिवूड चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे दिली. त्यानुसार जेम्स बाँडचा आगामी चित्रपट मराठीतूनही प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 

- 'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो

मराठीप्रमाणेच या चित्रपटाचा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजे २ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सुरवातीला तो इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती तरण आदर्श यांनी दिली. 

- डेली सोप : रांगडा शिवा अन् सिद्धीचे पुन्हा शुभमंगल!

'नो टाइम टू डाय'मध्ये डॅनियल क्रेगनेच जेम्स बाँड साकारला असून त्याचा हा या सीरिजमधील शेवटचा चित्रपट ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. डॅनियलनेच आतापर्यंत सर्वात जास्त वेळा बाँड या डिटेक्टिव्ह एजंटची भूमिका साकारली आहे. २००६ मध्ये कसिनो रॉयल हा त्याचा पहिला बाँडपट ठरला आहे. तेव्हापासून सुरू झालेला हा बाँडपटाचा सिलसिला नो टाइम टू डायपर्यंत पोहोचला आहे.

- 'आंबे खायला आवडतात का ऐवजी रात्री शांत कसे झोपता ?' दंगल गर्ल झायराचा पंतप्रधानांवर आणि अक्षयवर निशाणा

loading image