IMD weather forecast 29 September 2026 rain alert
esakal
IMD weather forecast 29 September 2026 : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस देशातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी देशातील सुमारे २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हलका ते तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.