Maharashtra-Karnataka Row: दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर झाले महत्वाचे निर्णय; अमित शहांनी दिली माहिती

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्हीकडील मुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले होते.
Amit shah
Amit shah

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्हीकडील मुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले होते. दरम्यान, त्यांच्यामध्ये साधारण वीस मिनिटे बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या चर्चेची आणि निर्णयांची माहिती स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. (Maharashtra Karnataka Border Row Imp decisions taken after discussions with Amit Shah in presence of both CMs)

शहा म्हणाले, दोन्ही पक्षांशी केंद्राच्या गृहविभागाची चर्चा झाली. दोन्ही मंत्र्यांनी यावेळी वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक अॅप्रोच दाखवला. यामध्ये काही निर्णय झाले आहेत ते मी सांगू इच्छितो. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणीही यावर बोलणार नाही.

Amit shah
Boycott Pathaan: शाहरुख-दिपिकाचा 'बेशरम रंग' पाहून नेटकरी भडकले; बॉयकॉट ट्रेन्ड सुरु

दोन्ही राज्यांच्यावतीनं प्रत्येकी तीन याप्रमाणं सहा मंत्र्यांमध्ये बैठक होईल. त्यानंतर ते या मुद्द्यांवर चर्चा करतील. यामध्ये स्थानिक पातळीवरील प्रश्नांवरही दोन्ही बाजूंकडील कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी यामध्ये प्रवाशी, व्यापारी यांना त्रास होता कामा नये. यासाठी दोन्ही बाजूंनी आयपीएस अधिकारी नेमण्याची तयारी दाखवली आहे.

Amit shah
Parambir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अन् अर्णब गोस्वामींमध्ये 'सेटलमेंट'; परमबीर सिंह भरणार दंड!

दोन्ही संघर्षात फेक ट्विट केले गेले असंही समोर आलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचे फेक ट्विट्स जिथं समोर आले आहेत तिथं गुन्हा दाखल केला जाईल. तसेच ज्यांनी हे केलं आहे त्यांना जनतेसमोर एक्पोज केलं जाईल, असंही शहा यावेळी म्हणाले.

हे ही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

मी दोन्हीकडील नेत्यांना सांगेल की राजकीय कार्यक्रम ते घेऊ शकतात पण ते जनतेच्या हिताचे असावेत. यामध्ये राजकारण करु नये, यामध्ये जी कमिटी स्थापन केली आहे त्याचं काम तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय याची वाट पाहावी, असं आवाहनही यावेळी अमित शहा यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com