आज देशात अन् देशात काय घडलं? वाचा एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
sakal breaking notifiction
sakal breaking notifictionesakal

भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी गौतम नवलखा यांची सुटका, 24 तास नजरकैदेत

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आठवडाभरानंतर भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यांना आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नवी मुंबईतील कम्युनिटी हॉलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे.

निवृत्त आयएएस अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

निवृत्त आयएएस अरुण गोयल यांची निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला संमती दिली आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात त्यांना तातडीने या पदावर रुजू व्हावे लागेल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असताना त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच वेळी, त्याचे निकाल 8 डिसेंबर रोजी घोषित केले जातील.

विशेष म्हणजे अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर ३१ डिसेंबर २०२२ रोजी ते निवृत्त होणार होते, मात्र महिनाभरापूर्वी त्यांनी १८ नोव्हेंबरला म्हणजे कालच आपल्या पदाचा राजीनामा दिला.

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षात फुट पडली?

 शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचा अत्यंत जवळचा सहकारी, पक्षाचा तरुण चेहरा अशी ओळख असलेले शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा केली नाही. 

मुंबई-पुणे रेल्वे सेवा सोमवारपर्यंत बंद

मध्य रेल्वेनं रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं आता सोमवारपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे बंद राहणार आहेत.

आम्हाला भारतरत्न नकोच; ठाकरे गटाच्या मागणीवर सावरकर वंशजांची भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी आमच्या म्हणजेच सावरकरांच्या कुटुंबियांपैकी कुणीही केली नाही. आमची तशी इच्छाही नाही, असं वक्तव्य सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केली आहे.

सोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या संजय कार्लेचा मृतदेह सापडला

मुंबई-गोवा महामार्गावर दोन दिवसापासून उभ्या असलेल्या ऑडी कारमध्ये एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांनी हा मृतदेह बाहेर काढून फारेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. हा मृतदेह संजय कार्लेचा असल्याचं सांगितलं जात आहे. सोन्याची बनावट नाणी विकून कार्ले अनेकांची फसवणूक करायचा. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचंही बोललं जात आहे.

मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभात शरद पवार बोलत होते

मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभात त्यांना डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, आजकाल मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. वेगवेगळ्या गोष्टींचं शिक्षण घेता येत आहे.

राज्यपाल, शरद पवार, गडकरी एकाच व्यासपीठावर

महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाच्या नजरा आज एका खास कार्यक्रमाकडे आहेत. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन विरोधी पक्षांचे तगडे नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल उपस्थित आहेत. गडकरी आणि पवार या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी लीट पदवी मिळाली आहे.

विमान आणि अग्निशमन दलाच्या गाडीला अपघात

लिमा विमानतळावर अपघात

विमान आणि अग्निशमन दलाची गाडी यांच्यात धडक

अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा मृत्यू

विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप

रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला, सावरकरांच्या विधानाबाबत चर्चेची शक्यता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. मात्र यात्रेदरम्यान राहुल गांधी वारंवार स्वातत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासंबधी रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.

देशासाठी दोन निरुपयोगी जीव; चित्रा वाघ यांची तुषार गांधी, राहुल गांधींवर खोचक टीका!

भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राहुल गांधी आणि तुषार गांधी या दोघांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “आपापल्या पणजोबांच्या पुण्याईवर जगणारे, देशासाठी २ निरुपयोगी जीव… अहो रुपम् अहो ध्वनीम्…”, असं चित्रा वाघ ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. यासोबत संबंधित वृत्ताचा स्क्रीनशॉट त्यांनी ट्वीट केला आहे.

राष्ट्रवादी आणि भाजपाचे दोन बडे नेते आज एकाच व्यासपीठावर

राज्याच्या नजरा आज एका खास कार्यक्रमाकडे आहेत. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन विरोधी पक्षांचे तगडे नेते उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी लीट पदवी मिळणार आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन होणार 7 ते 29 डिसेंबर दरम्यान

संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. याबाबतची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या रॅलींना आजपासून सुरुवात; २५ जाहीर सभांना संबोधित करणार

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गुजरात निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभरात एकूण 25 सभा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

आफताब पूनावालानं श्रद्धावर स्वत:च्या बहिणीप्रमाणं प्रेम करायला हवं होतं - मौलाना कासमी

दारुल उलूम रहमानिया मदरशाच्या (Darul Uloom Rahmaniya Madrasah) मौलानानं श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Walker Murder Case) आक्षेपार्ह विधान केलंय. उत्तर प्रदेशातील लहरपूरमधील मौलाना अहमद कासमी (Maulana Ahmed Qasmi) यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय, 'आफताब पूनावालानं श्रद्धावर स्वत:च्या बहिणीप्रमाणं प्रेम करायला हवं होतं.' मौलाना कासमी यांनी आफताब आणि श्रद्धाच्या नात्याला विरोध करत म्हटलंय की, 'इस्लाम मुस्लिमांना (Muslim) गैर-मुस्लिमांशी लग्न करण्याची परवानगी देत ​​नाही.

'मी माझं पद दाखवलं तर बरीच लफडी बाहेर येतील' - गुलाबराव पाटील

विरोधकांकडून सातत्याने माझ्यावर कुरघोड्या केल्या जात आहेत. मात्र मी शांततेने काम करणारा माणूस आहे. मी माझं पालकमंत्री पद आणि सरकार अजून कोणाला दाखवलं नाही. जर मी दाखवलं तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.

राज्यभरात थंडीची लाट, तापमान घसरलं; महाबळेश्वरमध्ये तापमान 11 अंशांवर

राज्यभरात थंडीची लाट सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान घसरलं आहे. पुण्यातही सकाळी थंडी जाणवायला लागली आहे. महाबळेश्वरात तापमान 11 अंशांवर गेले तर वेण्णालेक परिसरात 6 अंशांवर गेले आहे. रबी पिकांना पोषक थंडी पडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

औरंगाबादमध्ये स्विफ्टचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील कायगावजवळ भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत.कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आर कारची समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसंच पोलिसांनाही या दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली.

कव्वालीच्या कार्यक्रमातखासदार इम्तियाज जलील यांच्यावर अक्षरशः पैशांचा पाऊस

एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांचा वर्षाव करण्यात आला. औरंगाबादमधील आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर नोटांचा पाऊस पडत होता. तर जलील यांच्यावर पैसे उधळण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत.

मुंबई विभागात पुलाच्या कामासाठी २७ तासांचा ब्लॉक

मुंबई विभागात पुलाच्या कामासाठी २७ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबईला येणाऱ्या रेल्वे रद्द केल्या आहेत. यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वेचा देखील समावेश आहे. तर काही रेल्वे मुंबईला न जाता पुण्यापर्यंत धावणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ तास सुरु राहणारे हेल्पडेस्क देखील सुरु केले आहे. प्रवाशांना आवश्यकता भासली तर पुणे स्थानकावरून एसटी गाड्या सोडण्याचे देखील नियोजन झाले आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.