दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

देशासह राज्यातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

निपाणी, चिकोडीत वळीवाची विजेच्या गडगडाटासह हजेरी

निपाणी, चिकोडी शहर व परिसरात सोमवारी अचानक विजेच्या गडगडटासह सायंकाळी वळीवाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढला होता. आज सायंकाळी आलेल्या वळीवाने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसापासून सतत ढगाळ वातावरण होत होते. पण पावसाने हजेरी लावली नव्हती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ऊन सावलीचा खेळ चालू होता. सायंकाळी सहाच्या सुमारास चिकोडी शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

...तर पश्चिम बंगाल सरकारविरुद्ध कायदेशीर कारवाई करु- शाह

पश्चिम बंगाल सरकाने द केरळ स्टोरी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे. त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करु, असा इशारा निर्माते विपुल शाह यांनी दिलाय.

पुण्यात आजही पावसाला सुरुवात

पुण्यातील औंध, बाणेर रोड आणि विद्यापीठ परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

फडणवीसांनी आमची काळजी करु नये- अजित पवार

फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याची गरज नाही, असा टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले, सरकारला धोका नाही, असं सांगावं लागतं. मात्र परिस्थिती वेगळी आहे. अधिकाऱ्यांकडून मिळत असलेली माहिती निराळी असल्याचं सांगून अजित पवारांनी खळबळ उडवून दिली.

राहुल नार्वेकर ९ मे पासून लंडन दौऱ्यावर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ९ मे पासून लंडन दौऱ्यावर जात आहेत.

शरद पवार निपाणीकडे रवाना, हेलिकॉप्टरने कागलमध्ये दाखल

शरद पवार निपाणीकडे रवाना, हेलिकॉप्टरने कागलमध्ये दाखल झाले आहेत.

केरळमधील बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटक बोट उलटली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त करत मदत जाहीर केली.

“राज्यात व देशात जनतेला सत्ताबदल हवाय”- शरद पवार

राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात जनतेला सत्ताबदल हवाय. सर्वत्र फिरताना जनतेची हीच भावना दिसून येते. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आता सर्व विरोधकांनीही एकत्र येण्याची आत्यंतिक गरज आहे. त्यादृष्टीने विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी आपणही प्रयत्नशील असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.

दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या 2 आठवड्यांपासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी किसान युनियनचे कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले, तिथे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड लावले होते. मात्र, कुस्तिपटू आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

कर्नाटक निवडणुकीत राज ठाकरेंचं मराठी कार्ड

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी जंगी सभा आणि जोरदार प्रचार केला आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत कर्नाटकातील मराठी मतदारांना जाहीर आवाहन केलं आहे.

सांताक्रूझमध्ये ८५ वर्षीय वृद्धाची हत्या

सांताक्रूझमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका ८५ वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. केअर टेकरनेच हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

राजस्थानमध्ये हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले

राजस्थानमध्ये हवाई दलाचे (Air Force) विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले. राजस्थानच्या हनुमानगडजवळ ही घटना घडली आहे.

शरद पवार फडणवीसांना उत्तर देणार, म्हणाले...

कोण पार्सल आहे हे देवेंद्र फडणवीस यांना निपाणीतून सांगेन. मी निपाणीला जाणार आहे. कोण पार्सल आहे. या सगळ्या संदर्भात मी तिथे बोलणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निपाणीत गेल्यानंतर शरद पवार फडणवीसांच्या टीकेला काय उत्तर देणार? याकडेच सर्वांच लक्ष असेल

राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीमधील सभेतून केली होती. त्यांच्या या टीकेचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बिहारचे CM पवारांच्या भेटीला जाणार; 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक

लवकरच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठी आता फक्त चार ते पाच तारखा उरल्या आहेत. यामध्ये ८ ते १२ मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Politics : शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या घरी मोठी चोरी

केरळच्या मलप्पुरममध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सामनातून शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया उमटतील. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे.

नितीश कुमार ११ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलनाला आता महाराष्ट्रातल्या क्रीडापटूनी पाठिंबा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com