

Latest Marathi News Live Update
esakal
वाघोली येथील आय.व्ही. इस्टेट परिसरातील किड्झी प्री-स्कूलमध्ये रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने ही घटना रविवारी शाळेला सुटी असल्याने अनर्थ टळला. मात्र, आगीमध्ये शाळेच्या वस्तू, पुस्तके आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली.