

maharashtra-marathi-live-news
esakal
बारावीच्या परीक्षेची काठिण्यपातळी अकरावीच्या अभ्यासक्रमात जुळवून घेत, विविध प्रवेश परीक्षा अकरावीपासून घेता येईल का, याबाबत चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पर्यायांवर चर्चा झाली. तसेच विद्यार्थ्यांचे खासगी क्लासवरील अवलंबित्व कमी करण्याबाबतही समिती उपापयोजना सुचविणार आहे.