Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..

Breaking Marathi News live Updates 16 September 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
 live Updates news in marathi
live Updates news in marathiesakal
Updated on

गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

गेवराईः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी गोदावरी काठावरील गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना धीर देत गोदावरी काठावरील प्रलंबित प्रश्‍न लवकर निकाली काढण्याचा शब्द देत नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

भाजपमध्ये घराणेशाही नसून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलं.

Amravati Live: गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिराजगाव कसबा येथे मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गावातील रस्त्याना नदीचे स्वरूप आले.अतिपावसाने सोयाबीन,कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला. काही वेळासाठी गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

Pune Live: पुण्याला पावसाने झोडपलं

पुणे शहरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. आज पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मार्केट यार्डमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

Gadchiroli Live: अस्वलांच्या भयानक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

गडचिरोलीत गाय चारनीसाठी गेलेल्या दोन आदिवासींवर अस्वलांच्या भयानक हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mumbai Live : पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत 

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा विस्कळीत झालीआहे, ज्यामुळे गाड्या २५ ते ३० मिनिटांपर्यंत उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे लोकल सेवेला विलंब झाला आणि प्रवाशांना याचा फटका बसला आहे. स्लो ट्रॅक वरून जलद ट्रॅक वर जाणाऱ्या पॉईंट फेल झाल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसत असून गाड्यांना गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

Dhule Live : धुळे जिल्ह्याचा विकास थांबला: ११७ ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळेना!

धुळे जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतींना केंद्र शासनाकडून मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा निधी थांबविण्यात आला आहे. आवश्यक लेखापरीक्षण वेळेवर न करणे, ग्रामपंचायत विकास आराखडे (जीपीडीपी) व इअरबुक तक्ते अपलोड करण्यास टाळाटाळ करणे आणि काही ठिकाणी प्रशासक कार्यरत असल्याने या ग्रामपंचायतींना निधीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे गावातील मूलभूत सोयी-सुविधांवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai Live : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

आगीत दुचाकी जळून खाक

सुदैवाने जिवितहानी नाही

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दुचाकीला लागलेली आग विझवले

Live : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

तालुक्यातील चिकलठाण येथे गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. संजय आसाराम दळे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Kolhapur Live : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याने उद्या (मंगळवार) दिवसभर भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत गर्भगृह बंद राहणार असून, या काळात भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

Mumbai Live: मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

मुंबई गुन्हे शाखा कक्ष-12 ने गोरेगाव पूर्वेतील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अवैध कॉलसेंटरवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 93 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या ठिकाणी GreeksquadMac Cafe या नावाखाली अमेरिकन नागरिकांना बनावट टेक्निकल सपोर्ट देत फसवणूक केली जात होती. आरोपी स्वतःला मायक्रोसॉफ्टचे टेक्निशियन असल्याचे सांगून संगणक व्हायरस काढून टाकण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून 500 ते 1000 डॉलर वसूल करत होते. पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेत लॅपटॉप, मोबाईल, हार्डडिस्क यासह इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलम 419, 420, 384 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Buldhana Live: बुलढाण्यात मोमीनाबाद गावाचा संपर्क तुटला

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मोमीनाबाद गावात जाण्यासाठी असलेल्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने दरवेळी वाण नदीला पूर आल्यावर गावकऱ्यांचा संपर्क तुटतो. आज 16 सप्टेंबर रोजी नदीला पूर आल्यानेही मोमीनाबाद गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. या परिस्थितीत नागरिकांना पाण्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असून, आजारी रुग्णांना खाटेवर टाकून नेण्याची वेळ येते.

Pune Live: आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

आयुष कोमकर हत्येच्या प्रकरणात महत्त्वाचा टप्पा समोर आला आहे. आरोपी कृष्णा आंदेकर याला विशेष मोका कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून, त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सुनावणीमुळे तपासाला गती मिळणार असून पुढील चौकशीसाठी पोलिसांना आवश्यक वेळ मिळाला आहे.

परभणीत पूरस्थिती; शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हातपरभणीत पूरस्थिती; शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

परभणी जिल्ह्यात गेल्या ४-५ दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. याच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. परभणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी नुकसानीची पाहणी केली व मदतकार्य केले. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

Chandrashekhar bawankule : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे की, कुणबी प्रमाणपत्र देताना संपूर्ण पडताळणी करूनच ते दिलं जाणार. ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केलं. तसेच प्रमाणपत्र देताना अधिकारी अत्यंत काळजीपूर्वक काम करतील, अशा सूचना देखील बावनकुळे यांनी दिल्या.

Chhagan Bhujbal Live : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

"ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरला जावा"

"सरकारचा नव्याने काढलेला जीआर वादग्रस्त ठरत आहे"

"याचिकांवर त्वरित निर्णय घेणे आवश्यक"

– मंत्री छगन भुजबळ

Latur Live : महादेव कोळी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे , वरून मुसळधार पाऊस कोसळतोय, तरी मोठ्या संख्येने समाजातील महिला आणि पुरुष या ठिया आंदोलनावरती ठाम आहेत. मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी आदिवासी समाजाला देखील एसटी मधून जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडीटी साठी सुलभता द्यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे.

Tuljapur Live : तुळजापूरमध्ये हजारोच्या संख्येने बंजारा समाज एकवटला

तुळजापूर मध्ये हजारो च्या संख्येने बंजारा समाज एकवटला

तुळजापूर मध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक येण्यापूर्वी बंजारा समाज एकवटला

हैदराबाद गॅझेट मध्ये एसटी प्रवर्गात आरक्षणाच्या मागणीला घेऊन बंजारा समाज आज तुळजापूर शहरात काढणार होता मोर्चा

पण पोलिसांनी बंजारा समाजाच्या फक्त निवेदन देण्याला दिली परवानगी मोर्चाला परवानगी नाकारली

बंजारा समाज मोर्चा काढण्यावर ठाम शासकीय विश्रामगृह परिसरात हजारो बंजारा समाजाचे कार्यकर्ते एकवटले

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या येण्याअगोदरच तुळजापूर शहरात गोंधळाची परिस्थिती

Nashik Live : धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

- धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

- संशयित आरोपी उद्धव निमसे भाजपचे माजी नगरसेवक

- नाशिक पोलिसांनी उद्धव निमसेंना नाशिक न्यायालयात केलं आज हजर

- राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणात उद्धव निमसे होते फरार

- निमसे यांच्यासह बारा ते तेरा जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात दाखल आहे खुनाचा गुन्हा

- २२ ऑगस्टला धोत्रेवर करण्यात आला होता प्राणघातक हल्ला, तर २९ ऑगस्टला उपचारादरम्यान झाला होता मृत्यू

- तब्बल वीस दिवस भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे होते फरार

- मोबाईल न बाळगता चार ते पाच राज्यात निमसे यांनी ट्रॅव्हल बसने केला प्रवास

- पोलिसांना थांगपत्ता लागू नये, यासाठी निमसे यांनी हॉटेलमध्ये मुक्काम करणेही टाळलं होतं

- काल निमसे पोलिसांना शरण आल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नाशिक पोलिसांनी केली होती अटकेची कारवाई

Live: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायमूर्तींनी राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. “३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्या,” असे आदेश न्यायालयाने दिले.

Live: सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी सुरू

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आयोजनासंदर्भातील याचिकांवर सुनावणीला सुरुवात झाली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश दिला होता. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित खटल्यांमुळे २०२२ पासून या निवडणुका रखडल्या होत्या. आता त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झाली आहे.

Live: पूरग्रस्त पंजाब दौऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे; दुधन गुजरन गावात दिलं त्वरित मदतीचं आश्वासन

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पंजाबमधील पूरग्रस्त दुधन गुजरन गावाला भेट देत बाधित कुटुंबांची विचारपूस केली. त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना त्वरित मदत आणि पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले.

Mumbai Live: ससून डॉक वाचवा; कोळी बांधवांचा हक्क जपा!

मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉक येथे पुन्हा एकदा आंदोलनाची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद आता तीव्र झाला असून त्यामुळे ससून डॉकचे कामकाज ठप्प झाले आहे. स्थानिक कोळी बांधवांनी सरकारकडे ठाम मागणी केली आहे की, तत्कालीन केंद्रीय जहाजवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री एकनाथराव खडसे यांनी घेतलेला निर्णय तातडीने अंमलात आणावा.

कोळी कम्युनिटीचे म्हणणे आहे की एमबीपीटीकडून सुरू असलेला त्रास त्वरित थांबवला नाही, तर त्यांना अनिश्चितकालीन संपावर जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. "मुंबई आमच्या कोळ्यांची आहे, कोणाच्या बापाची नाही," असे ठाम विधान करून कोळी बांधवांनी सरकारला इशारा दिला आहे. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर शहरातील मत्स्यव्यवसाय आणि मासळी पुरवठा यावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Jalna Live: जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

कपाशीमध्ये साचलेल्या पाण्यात पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

अंबड तालुक्यातील भांबेरी या गावातील शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी

जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून याचा प्रचंड तडाखा शेतकऱ्यांना बसलेला आहे

खरीप हंगामातील कपाशी पिकासह मोठ्या प्रमाणात फळबागा देखील पाण्याखाली दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं

Nashik Live: धोत्रे खून प्रकरणात उद्धव निमसेंना २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

संशयित आरोपी उद्धव निमसे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. नाशिक पोलिसांनी उद्धव निमसेंना नाशिक न्यायालयात आज हजर केले. राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणात उद्धव निमसे फरार होते. निमसे यांच्यासह बारा ते तेरा जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. २२ ऑगस्टला धोत्रेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, तर २९ ऑगस्टला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तब्बल वीस दिवस भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार होते. मोबाईल न बाळगता चार ते पाच राज्यात निमसे यांनी ट्रॅव्हल बसने प्रवास केला. पोलिसांना थांगपत्ता लागू नये म्हणून निमसे यांनी हॉटेलमध्ये मुक्काम करणेही टाळले होते. काल निमसे पोलिसांना शरण आल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

Beed Live : मनोज जरांगे पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर

काल बीड जिल्ह्यामध्ये झाला, धुवाधार पाऊस शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त भागांची मनोज जरांगे पाहणी करणार आहेत.

आष्टी कडा व शिरूर भागामध्ये ढगफुटीजन्य परिस्थिती पाऊस झाला होता यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या भागाची पाहणी करणार आहेत. अंतरवाली सराटी मधून मनोज जरांगे पाटील हे बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Nashik Live : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले.

नाशिकच्या उमराणे येथील रामेश्वर कृषी या खाजगी बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त होत त्यांनी देवळा-मालेगाव रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले.

कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत असून भाव घसरल्याने शेतकऱ्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती,दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहचत त्यांनी आंदोलन कर्त्यांची समजूत काढली.

Live : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Summary

प्रत्येक निवडणुकीत प्रामुख्याने गाजलेल्या शहादा तालुक्यातील रहाटयावड धरणाचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असून सद्यस्थितीत गेल्या आठ वर्षांपासून धरणाचे काम रखडले आहे.

या धरणामुळे जवळपासच्या 15 गावांना पाणीटंचाईचा समस्येपासून मुक्तता होणार आहे...

मात्र एकदा मागणी करूनही धरणाचे काम होत नसल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेचं नवं ॲप! प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार गाड्यांची माहिती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 'केआर मिरर' केआरसीएल मोबाइल ॲप सुरू केले आहे. हे ॲप मराठीसह चार भाषांत कार्यान्वित असून यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना एका क्लिकवर रेल्वे गाड्यांची स्थिती समजू शकणार आहे. तसेच प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.

Railway Ticket Booking: ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

भारतीय रेल्वेने सामान्य आरक्षण तिकिटे ऑनलाइन बुक करण्याच्या पद्धतीत मोठा बदल आणला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून, आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅप वापरणाऱ्या प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या पहिल्या १५ मिनिटांत आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असेल. म्हणजेच तिकीट बुकिंग सुरू होताच सामान्य तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशाला बुकींग प्रक्रियेत पुढे जाण्यापूर्वी त्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून त्यांची ओळख पडताळणी करावी लागणार आहे.

Mumbai Live: परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

मुंबईला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी त्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई पावसाच्या आकडेवारीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता १४,३०,३४५ दशलक्ष लिटर म्हणजेच ९८.८२ टक्के आहे.

RBI New Guidelines: फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांची सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्यासाठी आरबीआयने आजपासून पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यात कठोर पात्रता, विवाद निराकरण धोरण आणि आर्थिक स्थिरता आवश्यकतांचा समावेश आहे.

Mumbai Live: मुंबईला पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी मुंबई आणि त्याच्या उपनगरात ढगाळ आकाश आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवसा विजांसह गडगडाटी वादळे येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट दिला असून विजांसह गडगडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Beed Live : बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन

बीडच्या शृंगारवाडी येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आमचे ११ सुशिक्षित क्वालिफाईड मुलं आहेत. तुमच्या अकरा मुलींचा विवाह आमच्या मुलांसोबत लावा असे वक्तव्य केल्यानंतर बीडच्या तलवाडा मध्ये लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Jalna Live : जालन्यात दोन गटात हाणामारी, अर्जून खोतकऱ्यांच्या दौऱ्यावेळी घडला प्रकार

जालन्यात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडला आहे अर्जून खोतकऱ्यांच्या दौऱ्यावेळी हा प्रकार घडला.

Mumbai Live  : अर्थखात्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, नाही तर आम्ही काळी पत्रिकाचा जाहीर करू - नाना पटोले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची भरपाईबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. तिजोरी लुलण्याचं काम सुरु असल्याचे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, असेही ते म्हणाले. तसेच अर्थखात्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, नाही तर आम्ही काळी पत्रिकाचा जाहीर करू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

Jalgaon Live : पुरामुळे जळगाव- जामनेर वाहतूक ठप्प

जामनेर जळगाव रोड वरील चिंचखेडा बुद्रुक येथील खडकी नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने जळगाव जामनेर वाहतूक ठप्प झाली असून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

Mumbai Live : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी  घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान ही भेट कशासाठी होती याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Vidarbha News Updates : विदर्भात ८ महिन्यात २९६ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

विदर्भात नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचं चित्र दिसून येतंय. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकरी आत्महत्या झाल्या. तर गेल्या ऑगस्ट महिन्यात 28 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा मदतनिधीही वितरीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News Live Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्याला हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. पुढील ३ तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Beed Heavy Rain : बीडमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान

बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी गावात तर एका शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत त्याच्या जनावरांसाठी साठवलेली कडब्याची गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही घटना वानटाकळी गावात घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com