
इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने कहर केला असून नीरा नदीला पूर आला आहे. कळंबोली व कुरुबावी येथील नीरा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्यामुळे पुणे व सोलापूर जिल्हातील संपर्क तुटला आहे. जांबमध्ये नीरा नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आलंय. तर सणसरमध्ये ओढ्याला पूर आला असून १०० नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय.