

Bay of Bengal Monsoon Arrival Maharashtra
esakal
IMD Monsoon Update : नैऋत्य मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल वेगाने सुरू असून ७ ते ८ जूनच्या सुमारास तो राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या (IMD) विविध मॉडेल्स आणि अंदाजांतून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी परिसरात मॉन्सूनसदृश ढगांची घनता वाढताना दिसत असून दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने त्याची प्रगती सुरू आहे.