
उद्या सकाळी 10.30 वाजता काँग्रेस खासदारांची संसदीय पक्षाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत सभागृहाची रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे.
ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाने मागवला आहे. हावडा शहरात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये हिंसाचार उसळला होता.
पूर्व सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये १५० हून अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त होत असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाण्यात ठाकरे गटाची युवा कार्यकर्ती रोशनी शिंदे हिला झालेली मारहाण निंदणीय आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशा निंदनीय घटना घडत आहेत. राज्यात घडत असलेल्या घटनांवरून राज्यात कोणत्या मानसिकतेचे सरकार बसलंय ते दिसतंय असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी सरकारला धारेवर धरले.
पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे. चैत्र महिन्यात वसंतऋतूच्या स्वागतासाठी दगडूशेठ गणपतीला सूर्यफुलांचा अभिषेक करण्यात आला. अनेक भाविक ही आरास पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आणि सकाटा सीड इंडिया कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली.
ठाण्यातील युवासेनेच्या कार्यकर्तीला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ठाण्यात पोहोचले. त्यांनी जखमी कार्यकर्तीची भेट घेत विचारपूस केली.
तुमसर बाजार समितीची निवडणुकीस नागपूर उच्च न्यायालयानं स्थगितीचे आदेश दिले आहेत. या बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषगांने नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयानं आज निर्णय दिला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना दिलासा मिळताना दिसत आहे. लाहोरमधील न्यायालयानं (Lahore Court) माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना जाळपोळ, पोलिसांविरुद्ध हिंसाचार आणि हत्या या तीन प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.
संगीता डवरे यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. डवरे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेनं (Terrorist Organization) जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'ग्रुपनं 30 आरएसएस नेते आणि कार्यकर्त्यांची यादी जारी केली आहे. द रेझिस्टन्स फ्रंट ग्रुपनं दावा केलाय, की ते जम्मू आणि कश्मीरमध्ये RSS कार्यकर्त्यांचे रक्त सांडतील.' जानेवारीमध्ये सरकारनं यूएपीए अंतर्गत टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय.
ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणावर शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण झालेलीच नाही, केवळ मीडियासाठी याचा बाऊ केला गेला, असा आरोप शिवेसनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज ठाण्याला जाणार आहेत. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्या उपचार सुरु आहेत.
ठाण्यात महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांना भेटायला जात आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांची बैठकही झाली असल्याचं समजतं.
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 (COVID-19) चे 3,038 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोविडचे 21,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोविडमुळं 7 मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुळं 2, उत्तराखंडमध्ये 1, महाराष्ट्रात 1 (Maharashtra), जम्मूमध्ये 1 आणि दिल्लीत 2 मृत्यूची नोंद झाली आहे.
पुणे : राज्यात यंदा विद्यार्थ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर 12 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पाटील यांनी विभागीय उपसंचालक, शिक्षण अधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना दिलेल्या सूचनांनुसार मंगळवार दि.02 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करुन संबंधित सुट्टीचा कालावधी रविवार दि. 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा.
पुणे महानगर पालिकेच्या एकाही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर आलीये. नायडू, कमला नेहरू, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यांसारखा महानगर पालिकेच्या रुग्णालयात लसीकरण बंद आहे. लसींचा साठाच नसल्यामुळं पुण्यातील महानगर पालिकेतील लसीकरण बंद करण्यात आलं आहे. मार्चपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात मात्र लसीकरण बंद असल्याचं चित्र आहे. पुणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळं हे लसीकरण थांबवलं आहे. पुढील ८ दिवसांत कोरोना प्रतिबंधक लस या रुग्णालयात उपलब्ध होतील आणि लसीकरण सुरु होईल. सध्या पुणे शहरात परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन खबरदारी घेत आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.
दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरु असलेल्या आयपीएलवर कोरोनाचे सावट पसरले आहे.
बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेनं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
छत्रपतींच्या घराण्यातील संयोगिताराजे छत्रपती यांच्यासोबत नाशकात जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघानं केला आहे. या संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, राज्यातील मंदिरातून ब्राह्मण पुजारी हटवा अशी आमची मागणी आहे. नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुराणक्य वेदोक्त प्रकरणानंतर मराठा सेवा संघाने आज त्यांची भूमिका बुलढाणा येथे जाहीर केली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरोषत्तम खेडेकर म्हणाले, राज्यातील सर्व मंदिर भटमुक्त करून मंदिरांचे राष्ट्रीयकरण करा. ज्या प्रमाणे पंढरपूरातील मंदिर ब्राह्मणमुक्त आहे त्याचपद्धतीने सर्व मंदिरांत हे लागू व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील.
संजय राऊत यांना फार सिरियसली घेण्याची गरज नाही. जेलमधून बाहेर आल्यावर त्यांची पातळी घसरली आहे. मोदी यांनी जगाची अर्थव्यवस्था पुढं नेली आहे. मोदी यांच्या विषयी बोलून राऊत यांना समाधान मिळत असेल तर माहिती नाही, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली.
फेसबुक पोस्ट केल्याच्या कारणावरुन ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात हा प्रकार घडला. रोशनी शिंदे असं या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर (FIR) दाखल केलेली नाही.
मुंबईच्या ताडदेव भागात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीनं हल्ला केला. यामध्ये तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ताडदेव पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांसाठी कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, परीक्षा तोंडावर आलेली असताना एमपीएससीने कौशल्य चाचणीसाठी दिलेल्या हिंदी रेमिंग्टन की-बोर्डवर आक्षेप घेण्यात आला असून, राज्य परीक्षा परिषदेच्या धर्तीवर कौशल्य चाचणी घेण्याची मागणी करीत एमपीएससी परीक्षार्थींनी सोमवारी पुन्हा रस्त्यावर येत आंदोलन केले. दरम्यान, उमेदवारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर एमपीएससीने कौशल्य चाचणी मराठी रेमिंग्टन की-बोर्डवर होणार असल्याचे स्पष्ट केले.
बेंगळुरूहून वाराणसीकडं जाणार्या इंडिगो फ्लाइटचं (6E897) 137 प्रवासी विमानात असताना, तांत्रिक समस्येमुळं तेलंगणातील शमशाबाद विमानतळावर आज सकाळी 6.15 वाजता आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे.
मंगळवारी पहाटे दिल्लीमध्ये जोरदार पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरण थंड झाले. दिल्लीमधील हवामान गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरणाने होण्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वी व्यक्त केली होती. तसेच 4 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंशांच्या दरम्यान राहील आणि किमान तापमान 15 ते 16 अंशांच्या दरम्यान राहील. साधारणत: 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 33.5 आणि किमान तापमान 18.5 अंश सेल्सिअस असते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज 4 एप्रिल रोजी संपूर्ण दिल्ली, एनसीआर आणि गन्नौर, रोहतक, भिवानी (हरियाणा) बरौत, शिकारपूर, खुर्जा (उत्तर प्रदेश) आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर वाटखळे इथे पीक अप- इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मिळालेल्या माहितीनुसार, ३ जणांचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळ येथे इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०५ ए.एस ६३३७ व मालवाहू पिकप गाडी क्रमांक एम एच १४ जी.डी ४०७४ या गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी आहे.
श्रीरंगपट्टण : कर्नाटकात पुढील महिन्यात 10 मे रोजी विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) होणार आहेत. याआधीच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलाय. अलीकडंच, श्रीरंगपट्टणच्या दौऱ्यात शिवकुमार यांनी भररस्त्यात नोटा उडवल्या होत्या. याप्रकरणी मंड्या पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
एलॉन मस्क यांनी आज ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवलाय. पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.