

Maharashtra weather update
esakal
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रातील मॉन्सून पाऊस कमी झाला असला तरी काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान कायम आहे. आज (ता. २०) राज्यातील १३ जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.