

Maharashtra Rain Update
esakal
Maharashtra Rain Alert : राज्यात काही भागांत पावसाची उघडीप असली, तरी आज (ता. १९) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव आणि लातूर तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला विजांसह पावसाचा अंदाज देत येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही जोरदार सरींची शक्यता आहे.