बापूंच्या पुण्यतिथीला कालीचरणला ‘गोडसे आपटे भारतरत्न’ पुरस्कार

हिंदू महासभेने आठवडाभरापूर्वी हा कार्यक्रम जाहीर केला होता
Kalicharan
Kalicharanकालीचरण

ग्वाल्हेर : देशभरात रविवारी (ता. ३०) महात्मा गांधी यांची पुण्यतिथी (Mahatma Gandhi) साजरी करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ‘गोडसे आपटे स्मृती दिन’ म्हणून साजरी केली जाते. यावेळी हिंदू महासभेने पाच हिंदू रक्षकांना ‘गोडसे आपटे भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. यात बापूंवर अशोभनीय टिप्पणी करणाऱ्या संत कालिचरणचाही (Award to Kalicharan) समावेश आहे.

हिंदू महासभेने आठवडाभरापूर्वी हा कार्यक्रम जाहीर केला होता. असे असतानाही तो थांबविण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न केले नाही. एक पोलिस हिंदू महासभेच्या कार्यालयात पोहोचला होता. यावेळी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. हिंदू महासभेच्या कार्यक्रमासंदर्भात गुन्हे शाखेचे एएसपी राजेश दंडोतिया यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही बाब आपल्या माहितीत नसल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबत तो टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले.

Kalicharan
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

कार्यक्रमाला हिंदू महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदू महासभेने नथुराम गोडसे (Nathuram Godse) आणि आपटे या मारेकऱ्यांचे गुणगान केले. तसेच संत कालीचरण (Award to Kalicharan) याच्यासह पाच कार्यकर्त्यांना ‘गोडसे आपटे भारतरत्न’ पुरस्कार, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. संत कालीचरण यांच्या अनुपस्थितीत हिंदू महासभेचे प्रमोद लोह पात्रा यांनी पुरस्कार स्वीकारला.

भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रक्रिया आहे. रस्त्यावरील कोणालाही भारतरत्न मिळेल असे नाही.
- बीडी शर्मा, भाजप, प्रदेशाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com