झारखंडमध्ये मोठी दुर्घटना; कोळसा खाणीत दबून १३ कामगारांचा मृत्यू

बारापेक्षा जास्त लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची शक्यता.
coal selling illegally in market in wani of yavatmal
coal selling illegally in market in wani of yavatmal

झारखंडमधील धनबादमध्ये कोळसा खाणीमध्ये (Coal Mine Accident) काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी, निरसा ब्लॉकच्या ईसीएल मुग्मा भागात 20 फूट उंचीवरून मलबा पडल्याने सुमारे 13 लोकांचा (Died) मृत्यू झाला. या घटनेत १२ पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळावर सुरू करण्यात आले असून, घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याता आले आहे. ( Coal Mine Accident In Jharkhand)

coal selling illegally in market in wani of yavatmal
"बेरोजगारी, महागाईने त्रस्त नागरिकांच्या पदरी भोपळा"

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील (Jharkhand) अनेक भागांत बेकायदेशीर कोळसा उत्खनन व्यवसाय सुरू आहे. धनबादचा निरसा परिसर अवैध कोळसा उत्खनन आणि व्यवसायाचं केंद्र बनला आहे. निरसा परिसरातून बेकायदेशीर कोळसा उत्खनन (Illegal coal Mining) करून बंगाल आणि इतर राज्यांमध्ये पाठवला जातो. पोलिसांच्या संगनमताने गेल्या अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा सुरू आहे. या गोरखधंद्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. यासोबतच बेकायदेशीर कोळसा उत्खननादरम्यान मलबा पडून कामगारांचा मृत्यूही होतो.

coal selling illegally in market in wani of yavatmal
Budget 2022: 'देशातील मध्यमवर्गीयांचा केंद्राकडून विश्वासघात'

आज ही घटना घडली त्यावेळी महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेकजण या ठिकाणी अवैध उत्खनन करण्यासाठी आलेले होते. यावेळी अचानक २० फुट उंचीवरून मलबा कोसळला. या घटनेची माहिती मिळताच धनबादच्या निरसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर कोळशाने गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनने खोदकाम करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com