Accident on Ahmedabad-Vadodara Expressway: अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, कारमधील 10 जणांनी गमावला जीव

Accident on Ahmedabad-Vadodara Expressway: अपघाताची माहिती मिळताच 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. याशिवाय एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती.
Accident on Ahmedabad-Vadodara Expressway
Accident on Ahmedabad-Vadodara Expressway esakal

अहमदाबाद वडोदरा द्रुतगती मार्गावर नडियादजवळ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने टँकरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती.

कारमधील सर्व 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. Accident on Ahmedabad-Vadodara Expressway

अपघाताची माहिती मिळताच 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. याशिवाय एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती. अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्रफिक जाम झालं आहे.

Accident on Ahmedabad-Vadodara Expressway
Google Employees Arrested: Google CEO कार्यालयात घुसले पोलीस, अनेकांना अटक, काय आहे गाझा-इस्राइल कनेक्शन?

कसा झाला अपघात?

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर बुधवारी हा अपघात झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कार टँकरला मागून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. (accident News in Marathi)

नडियादजवळ ही घटना घडली. या अपघातामागचे कारण शोधले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.

Accident on Ahmedabad-Vadodara Expressway
Electoral Bonds: इलेक्टोरल बाँड्स ही जगातील सर्वात मोठी 'खंडणी योजना,' राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com