

Mallikarjun Kharge
esakal
संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर यावरून गंभीर आरोप केले आहेत. ८५० लोकसभा जागा करण्याच्या प्रस्तावातून सरकारला सत्ता आपल्या हातात घ्यायची आहे. हे विधेयक लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याचं खर्गे यांनी म्हटलं आहे. शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यात आली. बैठकीला आरजेडी आणि टीएमसीसह अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हते