Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान; भाजपची आज देशभरात निदर्शने

Patna Complain : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने राजकीय वाद निर्माण झाला. बिहार भाजप नेते कृष्ण कुमार यांनी पाटण्यात खर्गे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
Kharge’s Controversial Remark on PM Modi

Kharge’s Controversial Remark on PM Modi

esakal

Updated on: 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत कथितरीत्या केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी बिहारची राजधानी पाटणा येथे खर्गे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, या विधानाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच, भारतीय जनता पक्षाने देशभरात त्यांच्या विरोधात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com