
‘‘काँग्रेसच्या संविधान बचाओ यात्रेमुळे भाजपला धडकी भरली आहे. म्हणूनच ते ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण करून देत आहेत. केवळ स्वतःचे अपयश लपविण्यासाठीच आणीबाणीचे ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधान हत्या दिवस पाळत आहेत,’’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर आणि सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.