ममता बॅनर्जी पुन्हा केंद्राच्या विरोधात;तीन पोलिस अधिकाऱ्यांना पाठविण्यास नकार

Mamata-Banerjee
Mamata-Banerjee
Updated on

नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांच्या ताफ्यावर पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हल्ल्यासाठी जबाबदार धरून केंद्रीय गृहमंत्रालयाने तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी केंद्रात बदल्या केल्या आहेत. गृह मंत्रालयाने केडर नियमावलीअंतर्गत (प्रतिनियुक्तीचा अधिकार) आज ही कारवाई केली. मात्र ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारने या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीला पाठविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता भाजप व बंगाल सरकारमधील सत्तासंघर्षाला घटनात्मक पेचप्रसंगाचे स्वरूप येण्याची शक्‍यता आहे. 

नड्डा यांचा ताफा जाणार होता त्या भागातील सुरक्षेची जबाबदारी या तिघा अधिकाऱ्यांवर होती व त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका गृहमंत्रालयाने ठेवला आहे. यातील डॉ. भोलानाथ पांडे यांना "ब्यूरो ऑफ पुलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट'मध्ये (BPRD) (बीपीआरडी) पोलिस महासंचालक म्हणून चार वर्षांसाठी पाठविण्यात आले आहे. लष्करी व पोलिस दलातील भरत्यांसाठी असलेल्या "एसएसबी' संस्थेचे पोलिस उपमहासंचालक म्हणून प्रवीणकुमार त्रिपाठी यांना पाठविण्यात आले असून, राजीव मिश्रा यांना भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे "आय.जी.' म्हणून नियुक्त केले आहे. 

नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणी राज्यपाल (Governor) जगदीप धनकड (Jagdeep Dhankad) यांनी अहवाल पाठवल्यावर गृहमंत्रालयाने कडक कारवाई करण्याचे पाऊल उचलले होते. मात्र ममता यांनी केंद्राच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांना दिल्ली पाठविण्यास नकार दिला होता. आता ज्या तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यांनाही पाठविण्यास बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आता केंद्राचा आदेश न मानण्याबाबत राज्य सरकारवर केंद्रातर्फे काय कारवाई केली जाणार याबाबत प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शहांचा पुन्हा दौरा 
पश्‍चिम बंगालची निवडणूक तोंडावर आली असतानाच भाजप व तृणमूल कॉंग्रेसमधील वादाने आता हाणामारीचे स्वरूप घेतले आहे. जे. पी. नड्डा यांच्याबाबतीत घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही येत्या शनिवार-रविवारी पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. गजेंद्रसिंह शेखावत, संजीव बालियान, प्रल्हाद पटेल, अर्जुन मुंडा व मनसुख भाई मांडविया या केंद्रीय मंत्री व भाजप नेत्यांबरोबरच उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य न मध्यप्रदेशातील वरिष्ठ मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावरही बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. शहा येत्या 19 तारखेला या सर्वांची बैठक घेतील. दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन चिघळल्याच्या पार्श्‍वभूमीवर यावेळेस शहा मिदनापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या घरी भोजन करतील, असे जाहीर करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com