
लोकसभा निवडणुकीतबाबात ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत; म्हणाल्या...
कोलकाता : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Mamata Banerjee) भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. इतर पक्ष एकजुटीने सरकार स्थापन करतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Mamata Banerjee) जनता भाजपला केंद्रातील सत्तेतून हद्दपार करेल, असे भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. (Mamata Banerjee Latest Marathi News)
कोलकाता (Kolkata) येथे शहीद दिनाच्या रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) बोलत होत्या. भाजपने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांची भूमिका नव्हती ते देशाचा इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा: केजरीवालांना धक्का! सिंगापूरला जाऊ शकणार नाही; एलजीने नाकारली परवानगी
‘भाजपच्या (bjp) कैदेतून मुक्त व्हा, २०२४ मध्ये नागरिकांची सरकार आणा’ असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी नागरिकांना केले. तृणधान्ये, डाळी आणि २५ किलोपेक्षा कमी वजनाचे पीठ यासारख्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर जीएसटी लादणे ही लोकविरोधी चाल असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले. भाजप सर्व गोष्टींवर जीएसटी लावत असताना लोक काय खातील, असा प्रश्नही त्यांनी केला.
भाजपने महाराष्ट्राप्रमाणे बंगालचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल. काही लोकांना बंगालच्या भरती प्रक्रियेत त्रुटी दिसतात. परंतु, रेल्वे, केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये होणाऱ्या भरतीबद्दल काहीच का सांगितले जात नाही, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी केला. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष पश्चिम बंगालच्या बाहेर विस्तार आणि राज्याबाहेर जागा जिंकण्याच्या आपल्या योजना सुरू ठेवेल.
हेही वाचा: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीतील रुग्णालयात दाखल; दूषित पाणी प्यायले
बॅनर्जी यांनी बुधवारी म्हटले होते की, हुतात्मा दिनाची रॅली केंद्राच्या तानाशाही शासना विरोधात असेल. १९९३ मध्ये तत्कालीन डाव्या आघाडी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या रॅलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या १३ लोकांच्या स्मरणार्थ टीएमसी दरवर्षी २१ जुलै रोजी शहीद दिन साजरा करते. या घटनेच्या वेळी बॅनर्जी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.
Web Title: Mamata Banerjee Lok Sabha Election Bjp Kolkata
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..