please save democracy mamata banerjee appeals to the chief justice of india
please save democracy mamata banerjee appeals to the chief justice of india Sakal

BBC IT Survey : एक दिवस देशात मीडियाच राहणार नाही; ममता बॅनर्जींनी व्यक्त केली भीती

2002 च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटामुळे राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही कारवाई झाली.

बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतल्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणावर देशभरातून टीका होत आहे. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका केली आहे. एक दिवस देशात मीडियाच राहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

या आयकर विभागाच्या सर्वेक्षणाला ममता बॅनर्जी यांनी राजकीय सूडापोटी केलेली कारवाई म्हटलं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बीबीसीवरील आयकर विभाग सर्वेक्षणे अत्यंत दुर्दैवी आहे. एक दिवस, भारतात एकही मीडिया नसेल."

please save democracy mamata banerjee appeals to the chief justice of india
BBC IT Survey : 'बीबीसी'चं काय होणार? दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचं सर्व्हेक्षण सुरूच

मंगळवारी, आयकर विभागाने दिल्ली आणि मुंबईतील बीबीसीच्या आवारात करचुकवेगिरीचा आरोप करत सर्वेक्षण केले. 2002 च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटामुळे राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही कारवाई झाली.

please save democracy mamata banerjee appeals to the chief justice of india
BBC IT Raid : छापेमारीवर BBC ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आशा करतो की..."

भाजपशासित केंद्र सरकारवर निशाणा साधत काँग्रेसने या सर्वेक्षणाचा निषेध केला होता आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार टीकेला घाबरत असल्याचे या कृतीवरून दिसून येते. “बीबीसीच्या कार्यालयावरील आयकर विभागाचे छापे निराशाजनक आहेत आणि मोदी सरकार टीकेला घाबरत असल्याचे दर्शविते. या धमकावण्याच्या डावपेचांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. ही हुकूमशाही वृत्ती यापुढे चालू शकत नाही, ” असे काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com