

Mamata Banerjee Relative Death west bengal
esakal
West Bengal suspicious death : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दूरच्या नातेवाईक बृष्टि मुखर्जी घटक यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रामपूरहाट येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, तो सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.