esakal | सोनिया गांधींपुढे पेच; सीसीएप्रकरणी ममता बॅनर्जींचा धक्कादायक निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee will boycott opposition meeting against caa

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यानी विरोधकांची वज्रमूठ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या अंतर्गत येत्या 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची एक व्यापक बैठक बोलवण्यात आलीय.

सोनिया गांधींपुढे पेच; सीसीएप्रकरणी ममता बॅनर्जींचा धक्कादायक निर्णय 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोलकाता (Kolkata) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरातून आंदोलने होत आहे. या कायद्याच्या विरोधात सत्ताधारी भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न दिल्लीतील विरोधक करत आहे. पण, आता या विरोधकांच्या एकीमध्ये फूट पडत असल्याचं दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यातून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ममतांचा बैठकीला का विरोध?
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यानी विरोधकांची वज्रमूठ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या अंतर्गत येत्या 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची एक व्यापक बैठक बोलवण्यात आलीय. या बैठकीला उपस्थित राहण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बुधवारी (8 डिसेंबर) देशभरात बंदची हाक दिली होती. त्या बंदला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागले होते. त्यावरून ममता बॅनर्जी भडकल्या असून, त्यांनी या बंद संदर्भात काँग्रेसचा निषेध म्हणून, बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिलाय. बंदमधील हिंसक आंदोलनाचे आम्ही समर्थन कर नाही, असं ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या विधानसभेत स्पष्ट केलंय.

आणखी वाचा - 'हुकुमशाहीला अहिंसेने उत्तर देऊ'

काय घडलं पश्चिम बंगालमध्ये?
ट्रेड युनियनच्या बुधवारच्या 24 तासांच्या बंद वरून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्यांवर टीका केलीय. ज्या राजकीय पक्षांचे अस्तित्वच नाही ते आंदोलन करत आहेत, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावलाय. बंद सारख्या मार्गांचा अवलंब करून, हे राजकीय पक्ष राज्याच्या अर्थव्यवस्थेला धक्का देत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारचे आर्थिक धोरण, सीएए आणि प्रस्तावित एनआरसीच्या विरोधात बुधवारी ट्रेड युनियनच्या वतीने देशभरात बंद पाळण्यात आला. बंगालमध्ये सकाळीच कोलकात्याच्या काही भागात या बंदला हिंसक वळण मिळाले. उत्तर 24 परगना जिल्ह्यात डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको केला होता. रेल्वेच्या रुळांवर देशी बॉम्ब सापडल्याचा आरोप रेल्वे पोलिसांनी केला आहे.