कुटुंबाला नोटीस मिळाली तर आम्ही लढा देऊ; ममता बॅनर्जींचे केंद्र सरकारला आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee

कुटुंबाला नोटीस मिळाली तर आम्ही लढा देऊ; ममता बॅनर्जींचे केंद्र सरकारला आव्हान

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केंद्र सरकारला आव्हान दिले. कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या एजन्सींकडून नोटीस मिळाली तर आम्ही कायदेशीररित्या लढा देऊ, असं ममता यांनी म्हटलं. (mamata banerjee news in Marathi)

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

कोळसा घोटाळ्यात सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ममता यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर ममता यांनी कायदेशी लढा देण्यास तयार असल्याचं म्हटलं.

माझ्या कुटुंबाला (केंद्रीय संस्थांकडून) नोटीस मिळाल्यास, मी कायदेशीर लढा देईन. सध्याच्या काळात हे कठिण आहे. मात्र माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असंही ममता यांनी म्हटलं.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

ममता म्हणाल्या, कोळसा घोटाळ्याचा पैसा कालीघाटात जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतो. पण त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पैसे मां कालीकडे जात आहेत का? असा सवाल ममता यांनी केला. बॅनर्जी कोलकात्यातील कालीघाट परिसरात राहतात. हा परिसर काली मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तसेच बेकायदेशीरपणे संपत्ती मिळवण्यात आपण कोणालाही मदत केली नसल्याचं ममता यांनी म्हटलं.

Web Title: Mamata Banerjees Reply To The Central Government Ed Notice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..