विधानसभा सदस्यपदाची ममतांनी घेतली शपथ

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनकर यांनी त्यांना शपथ देवविली
mamta banerjee
mamta banerjeesakal

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनकर यांनी त्यांना शपथ देवविली. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

mamta banerjee
वीस वर्ष, मोदींची एकही सुट्टी नाही ते कोरोना काळात श्रीमंतांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ

प्रथेनुसार विधानसभेचे अध्यक्ष सदस्यांना शपथ देववितात. मात्र त्यात बदल करत राज्यपालांनी ममता यांनी सदस्यपदाची शपथ देवविली. पोटनिवडणुकीत विजयी झालेले तृणमूलचे नेते झाकिर हुसेन आणि अमिरूल इस्लाम यांनीही त्यांच्यानंतर शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी पोटनिवडणुकीत विजय मिळविणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांचा ५८ हजार ८३५ मतांनी पराभव केला होता. हा शपथविधी राजभवनात निश्‍चित करण्यात आला होता. मात्र त्याला विरोध दर्शविला, तसेच विधानसभेच्या अध्यक्षांनीही हा कार्यक्रम विधिमंडळाच्या बाहेर झाल्यास त्याला उपस्थित राहणार नसल्याचे कळविले होते. त्यानंतर विधासभेच्या अध्यक्षांनी राज्यपालांना सभागृहात येण्याचे निमंत्रण दिले. ते राज्यपालांनी स्वीकारले. शपथविधीनंतर लगेचच ममता बॅनर्जी या दुर्गापूजेच्या मंडपांचे उद्‍घाटन करण्यासाठी निघून गेल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com