
ममता बॅनर्जी नेहमी त्यांच्या भाजपविरोधातील कडवट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा जाहीर कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदींनाही सुनावलं आहे. त्यांचा भाजपद्वेष जगजाहीर आहे. मात्र, त्यांनी नुकतंच तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे डोसा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासही कारण राजकीय असल्याचं दिसतंय.
कारण देशात भाजप विरहीत आघाडी सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री लवकरच ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींसोबत झालेल्या मोबाईल संभाषणात दीदींनी डोसा खाण्याची मागणी केल्याचं सांगितलं.
देशात भारतीय जनता पार्टीला शहर देण्यासाठी संयुक्त पक्षांची आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांनी भाजप विरहीत आघाडीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी यश आलं नव्हतं. मात्र, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर राष्ट्रीत पातळीवर त्या अॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांच्या सरकारचं अधिवेशन राज्यपालांनी तहकूब केलं. (KCR to meet Uddhav Thackeray and Mamata Banerjee)
महाराष्ट्रातही राज्यपाल सत्ताधाऱ्यांना जुमानत नसल्याची टीका महाविकास आघाडीतील नेते करतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव हे देखील भाजपच्या विरोधात आघाडीत एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील दिसतात. यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यासोबतच ते ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. या दरम्यान ममतांनी त्यांना फोन केला होता.
"मला डोसा खायचा आहे"
ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला. आमच्यात चर्चाही झाली. त्यांनी मला बंगालला बोलावलं आहे. यानंतर त्या देखील हैदराबादला येणार असल्याचं म्हणाल्या. मला डोसा खायचायं असं त्या म्हणाल्या. यावर मीही त्यांना 'वेलकम' असं म्हटलंय.
आम्ही चर्चा करत आहोत. देशभरात अनेक राजकीय नेते आहेत. जे अजूनही बिगर-भाजप, गैर-काँग्रेस आघाडीची कल्पना मांडत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील माझी वाट पाहत आहेत. लवकरच मी मुंबईला जाणार आहे, असं केसीआर म्हणाले. एकदा श्री रामानुजाचार्य सोहळा संपल्यानंतर मी मुंबईला प्रस्थान करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.