esakal | ममतांचा ‘अवतार’ दुर्गेचा
sakal

बोलून बातमी शोधा

ममता

ममतांचा ‘अवतार’ दुर्गेचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोलकता : कोलकत्यामधील जगप्रसिद्ध दुर्गापूजा उत्सवामुळे यंदा राजकीय वादाचा भडका उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एका मंडळाने तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना देवत्त्व बहाल करणारी मोठी मूर्ती दुर्गेच्या बाजूला उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा: 'ती' स्वत:चे केस खायची, डॉक्टरांनी पोटातून काढला केसांचा गोळा

केश्तोपूर येथील उन्नयन समिती क्लबची ही संकल्पना आहे. त्यांच्यासाठी प्रसिद्ध शिल्पकार मिटू पॉल हे मूर्ती घडवीत आहेत. कुमारतुली स्टुडिओत फायबरग्लासची मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख त्यांच्या आवडत्या तांत साडीत दाखविण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे या मूर्तीत त्या नेहमी पायात घालतात त्या फ्लीप-फ्लॉप स्लीपरही आहेत.

मिंटू यांनी सांगितले की, संदर्भासाठी मी ममता यांची छायाचित्रे तसेच चित्रफितींचा अभ्यास केला. त्या कशा चालतात, कशा बोलतात, जनतेशी कसा संवाद साधतात याचे निरीक्षण करून चेहरा घडवित आहे.

हेही वाचा: पैशाच्या वादातून भाजप नेत्याला मारहाण; पाहा व्हिडिओ

मातीपासून बनविलेल्या दुर्गेच्या परंपरागत मूर्तीच्या बाजूला ममता यांची मूर्ती असेल. संपूर्ण मंडपाची संकल्पना त्यांच्या बहुचर्चित लक्ष्मीभांडार योजनेवर आधारित असेल. कुटुंबातील महिलेला दरमहा पाचशे ते हजार रुपये देण्याची योजना ममता यांनी सुरु केली असून त्यासाठी राज्यात रांगा लागत आहेत.

ममता यांच्या मूर्तीला दहा हात आहेत. या हातांमध्ये कोणतीही आयुधे नसून विविध योजनांच्या मुद्देसूद माहितीचे वर्णन करणारे फलक लावले जातील.

हेही वाचा: 'तुमचं कौतूक कोणत्या शब्दांत करावं' ते अवनीची ऐतिहासिक कामगिरी

इथेही ममता

दरम्यान, भवानीपूर या ममता यांच्या मूळ मतदारसंघातील ७५ पल्ली पूजा समितीने घोरेर मेये (घरची कन्या) या संकल्पनेचा अवलंब केला आहे. ममता यांनी सलग तिसऱ्यांदा सत्ता संपादन केल्यामुळे त्यांना सलाम करण्याचा उद्देश असल्याचे पदाधिकारी सुब्रत दास यांनी सांगितले. ममता यांचे स्वतःचे घर भवानीपूरमध्ये आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर त्या येथूनच पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे.

भाजपचा आक्षेप; `हा तर दुर्गेचा अपमान`

भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान खात्याचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, निवडणुक हिंसाचारात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या रक्ताने ममता यांचे हात माखलेले आहेत. अशा ममतांना देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न किळस आणणारा आहे. हा दुर्गेचा अपमान आहे.

मौन म्हणजे मूक संमती ः सुवेंदू

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, केवळ तुम्हाला खूष करण्यासाठी कुणीतरी तुमचे स्थान देवाच्या दर्जापर्यंत उंचावते आणि तुम्ही मौन बाळगता म्हणजे ही मूक संमतीच होय.

loading image
go to top