पोलिसालाच कारच्या बोनटवर बसवून फिरविले 2 किमी!

Untitled-4.jpg
Untitled-4.jpg

दिल्ली : आपल्या देशात सध्या वाहतूक पोलिसांबाबत काहीही घडू लागले आहे. दिल्लीत असाच एक प्रकार घडला आहे.  दिल्लीतील ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

आपल्या देशात पोलिसांबाबत अंत्यत चुकीचे समज-गैरसमज आहेत. दिल्लीत एक ट्रॅफिक पोलिस कर्मचारी वाहतूक व्यवस्थेबाबत तपासणी करत होता. यावेळी एका चारचाकीवाल्यास तपासणीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, या चारचाकी चालकाने तशीच गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या चारचाकीसमोर ट्रॅफिक पोलिस जाऊन थांबला, पण यावेळी या चालकाने गाडी तशीच पुढे नेली. यावेळी गाडीच्या बोनटवर या कर्मचार्याने उडी घेतली. 

यावेळी या चालकाने गाडी न थांबविताच तशीच 2 किलोमीटरपर्यंत घेऊन गेला. या घटनेची व्हिडीओ सध्या सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत आहे. ही घटना दिल्लीमधील गुरगाव परिसरातील नाग्लोई येथे मागील वर्षी नोव्हेंबर महिण्यात घडली होती. मात्र सध्या या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे.

या घटनेतील पोलिस कर्मचाऱ्याचे नाव सुनील होय. या घटनेत हा कर्मचारी जखमी झाला होता. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार हा कर्मचारी गाड्यांचे पेपर चेक करत होता. यावेळी इनोव्हा गाडीतून आलेल्या दोघांनी गाडी न थांबविता तशीच पुढे दामटली. यावेळी हा कर्मचारी गाडीसमोर असल्याने तो तसाच गाडी थांबविणयाचा प्रयत्न करत होता. परंतू या चालकाने गाडी न थांबविता तशीच पुढे नेली. 

यावेळी हा कर्मचारी गाडीच्या बोनटवर जाऊन बसला. या चालकाने गाडी न थांबविता तशीच 2 किलोमीटरपर्यंत पुढे घेऊऩ गेला. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com