वहिणी म्हणाली छोट्या दिराला आता बास...

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱया दिरासोबत वहिणीचे प्रेमसंबंध होते. वहिणीने प्रेमसंबंध थांबवून आपण विवाह करू म्हणून दिराकडे हट्ट धरला. दिराने वहिणीचा खून केल्याची घटना येथे घडली आहे.

चित्रकूट (मध्य प्रदेश): इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱया दिरासोबत वहिणीचे प्रेमसंबंध होते. वहिणीने प्रेमसंबंध थांबवून आपण विवाह करू म्हणून दिराकडे हट्ट धरला. दिराने वहिणीचा खून केल्याची घटना येथे घडली आहे.

युवक-युवतींची अवस्था पाहून पोलिसांनी मिटले डोळे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांगना घाटीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान योगेद्र कुमार यांची पत्नी सरिताचा (वय 25) मृतदेह असल्याचे समजले. याबाबत तपास सुरू केल्यानंतर सरिता हिचे कैलास सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सरिताचा खून केल्याची कबूली दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

वहिणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले म्हणून...

कैलासने तपासादरम्यान सांगितले की, वहिणी आणी माझे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आमच्यामध्ये शारिरीक संबंध होते. आमच्या प्रेमाबद्दल नातेवाईकांना समजल्यानंतर सरिताने घटस्फोट घेऊन माझ्यासोबत विवाह करण्याचा हट्ट धरला. परंतु, दोन महिन्यापूर्वीच माझा विवाह झाला होता. परंतु, वहिणी फोन करून त्रास देत होती. शिवाय, एकांतात भेटल्यानंतर पळून जाण्यासाठी दबाव टाकत होती. यामुळे तिला एकांतात भेटायला बोलवून खून केला आणि मृतदेह फेकून दिला.

पोलिस अधिकाऱयाच्या पत्नीने दरवाजा ठोठावला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man killed sister in law for love affair at madhya pradesh