Video: पोलिस अधिकाऱयाच्या पत्नीने दरवाजा ठोठावला अन्...

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

पोलिस अधिकाऱयाच्या पत्नीला आपल्या पतीवर संशय होता. पत्नीने मुलाला घेऊन पती राहात असलेल्या घराचा दरवाजा ठोठावला. यावेळी घरामध्ये युवती आढळून आली. यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली.

गंधवानी (मध्य प्रदेश): पोलिस अधिकाऱयाच्या पत्नीला आपल्या पतीवर संशय होता. पत्नीने मुलाला घेऊन पती राहात असलेल्या घराचा दरवाजा ठोठावला. यावेळी घरामध्ये युवती आढळून आली. यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रेमविवाह केला अन् कायमचाच निघून गेला...

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गंधवानी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.  गंधवानी पोलिस ठाण्याचे प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्नीला मारहाण केली आहे. नरेंद्र सूर्यवंशी यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. पती युवतीसह शासकीय निवसस्थानात असल्याची माहिती मिळाली. पत्नीने मुलाला सोबत घेऊन शासकीय निवासस्थानात पोहचली. दरवाजा ठोठावल्यानंतर दरावाजा उघडण्यात आला. मात्र, घरामध्ये पतीसह युवती होती. यामुळे भांडण सुरू झाले. भांडणानंतर पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळाचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली शिवाय पोलिसही आले. सर्वांसमोरच अधिकाऱयाने पत्नीला मारहाण केली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नवऱयाचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु आहे...

दरम्यान, पोलिस अधिकारी पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचे पाहिल्यानंतर अनेकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा घरगुती विषय असून, कोणी मध्ये पडू नये, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. यामुळे मारहाण होत असतानाही सर्वांनाच बघ्याची भूमिका घ्यावी लागली. नंतर मात्र, स्थानिकांनीच महिलेची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय निवासात असलेल्या युवतीला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी पुढील तपास करत आहेत.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer assaulted his wife at madhya pradesh